जागा मिळेल तिथे प्रचार कार्यालय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

ठाणे - निवडणूक काळात मतदारांच्या सतत डोळ्यासमोर राहण्यासाठी प्रभागात प्रचार कार्यालये थाटली जातात. तात्पुरत्या स्वरूपातील ही कार्यालये सध्या जागा मिळेल तिथे थाटण्याचा प्रकार ठाणे आणि दिव्यामध्ये सुरू आहे. पडीक जागा, रस्त्याच्या बाजूची मोकळी जागा, तोडलेल्या बांधकामांचे भाग, बांधकाम सुरू असलेली इमारत अशा कोणत्याही ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांची प्रचार कार्यालये दिसत आहेत. विशेष म्हणजे दिवा परिसर दाट लोकवस्तीचा असून या भागात उमेदवारांनी उभारलेली प्रचार कार्यालये बेकायदा बांधकामांमध्येच असल्याचे दिसून येत आहे.  

निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असून ८०५ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. मोठ्या पक्षांकडे स्वतःची मध्यवर्ती प्रचार कार्यालये असली, तरी प्रत्येक उमेदवाराला मात्र आपली स्वतंत्र प्रचार कार्यालये प्रभागा-प्रभागांमध्ये उघडावी लागत आहेत. 

प्रचाराच्या दिवसात मतदारांसमोर राहण्याचा प्रयत्न असल्यामुळे कार्यालये पटकावण्यासाठी सगळ्याच पक्षांची मोठी धावपळ सुरू आहे. शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसह अनेक अपक्षांनीही शहरभर आपली प्रचार कार्यालये सुरू केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अन्य महापुरुषांच्या तसबिरी, आवश्‍यक कार्यालयीन साहित्य अशा मोजक्‍याच वस्तूंच्या साह्याने ती थाटलेली आहेत. मात्र ती उभारण्यासाठीच्या जागेसाठी कुठलेच नियम नाहीत. त्यामुळे ते पाळण्याचा प्रश्‍नच येत नाही

 दिव्यामध्ये सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांची प्रचार कार्यालये असून बहुसंख्य कार्यालये बेकायदा बांधकामांमध्ये आहेत. स्मार्ट सिटीचा पुरस्कार करणाऱ्या भाजप, नियोजित शहराच्या गप्पा करणारा मनसे, शहरातील सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची कार्यालये ‘जागा मिळेल तेथे मांडा’ अशाच पद्धतीने उभारण्यात आली आहेत. काही अपक्ष उमेदवारांचे घरच प्रचार कार्यालय झाले आहे.

दुकानाचे बनवले कार्यालय
काही उमेदवारांच्या दुकानांनाही आता प्रचार कार्यालयाचे स्वरूप आले आहे. गोखले रोडवरील एका अपक्ष उमेदवाराने आपल्या सौंदर्य प्रसाधानांच्या दुकानाच्या चारही बाजूला ‘नारळ’ निशाणीचे फलक लावून दुकानालाच प्रचाराचे कार्यालय बनवले आहे. तेथील जुन्या पाडलेल्या इमारतीच्या मोकळ्या जागेत मनसेच्या उमेदवारांचे कार्यालय थाटले आहे. शिवसेनेने एका मोठ्या ज्वेलर्सच्या बाजूच्या दुकानात प्रचार कार्यालय उघडले असून तेथे संध्याकाळी कार्यकर्त्यांची गर्दी आणि गाड्यांच्या पार्किंगमुळे गोखले रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे. बी-केबिन परिसरामध्ये एका मोकळ्या दुकानाच्या गाळ्यात भाजपच्या एका उमेदवाराने प्रचार कार्यालय उघडले आहे. नौपाडा भागामध्ये अशी परिस्थिती असून अन्य भागातील प्रचार कार्यालयांची स्थिती यापेक्षाही वाईट आहे.

Web Title: promotion office