महिलांचा जोरदार प्रचार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

ठाणे - ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचार समारोपाला रविवारी सकाळपासूनच सुरुवात झाली. विशेषकरून महिला उमेदवारांसाठी महिला कार्यकर्त्या सकाळपासूनच घराबाहेर पडल्या होत्या. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून करण्यात आला. क्षेत्र वाढल्याने छोटे टेम्पो, जीप यांचा वापर कर्णा लावून प्रचारासाठी करण्यात आला. 

रविवार म्हटला म्हणजे घरात महिलांची सुग्रास जेवणाची घाई असते. मात्र प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने घरात जेवणाचा घाट न घालता महिला आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या होत्या. त्यानुसार उमेदवारांनीसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसाठी सुग्रास जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच सुट्टीचा वार असल्याने आजच्या प्रचारात महिलांनी आपल्या मुलांनासुद्धा सहभागी करून घेतल्याचे चित्र काही प्रभागात दिसले. शहरातील बालेकिल्ल्यांत त्या-त्या पक्षाच्या झेंड्यांचा रंग दिसत होता. सकाळपासूनच ठिकठिकाणचे परिसर घोषणांनी दणाणून गेले होते. 

गत निवडणुकीच्या प्रचारात सामील झाले होते. माझ्या आजूबाजूच्या बऱ्याच महिला प्रचारासाठी येतात. माझी ही प्रचारात येण्याची दुसरीच वेळ आहे. आज सकाळीच प्रचाराला आले आहे. माझी मुलगी पाच वर्षांची आहे. तिलाही सोबत घेऊन आले आहे. 
- कल्पना जाधव, कार्यकर्त्या, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

10 वर्षांहून अधिक वर्षे शिवसेनेचे काम करते आहे. शिवसेनेचा प्रचार मी बरीच वर्षे करत आहे. 15 दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू आहे. माझ्या घरातील सर्वच शिवसैनिक असल्यामुळे प्रचारकाळात मी पूर्ण वेळ प्रचारासाठी देते. रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचार चालणार आहे. मी पक्षासाठी थांबणार आहे. 
- अनिता शिंदे, कार्यकर्त्या, शिवसेना. 

Web Title: promotion of women