घरमालकांच्या नावे मालमत्ता कर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

मुंबई - गृहनिर्माण संस्थांच्या नावाने येणारी मालमत्ता कराची देयके यापुढे प्रत्येक सदनिकांच्या मालकांच्या नावे पाठवण्याचा निर्णय शुक्रवारी पालिका प्रशासनाने घेतला. मालमत्ता कराचे वैयक्तिक असेसमेंट करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. त्यानुसार यापुढे सदनिकांची स्वतंत्र देयके पाठवण्यात येणार आहेत.

नागरिकांनी मालमत्ता कर वेळेवर भरावा आणि पालिकेला महसूल मिळावा, यासाठी पालिकेने आणलेल्या ‘अर्ली बर्ड इंटेन्सिव्ह’ योजनेबाबतच्या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. शिवसेनेच्या राजूल पटेल यांनी सदनिका मालकांना स्वतंत्रपणे मालमत्ता कराची देयके द्यावीत, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली. या वेळी शिवसेनेचे संजय घाडी यांनी आतापर्यंत किती कर थकीत आहे आणि तो वसूल करण्यासाठी काय करणार आहात, असा सवाल केला. सरकारी इमारतींनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर थकवला असल्याचा मुद्दा दिलीप लांडे यांनी मांडला. राज्य सरकारने एसआरए, अल्प आणि अत्यल्प गटांतील रहिवाशांना मालमत्ता करात सवलत देण्याबाबत परिपत्रक काढले आहे, त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मंगेश सातमकर यांनी केली. मालमत्ता कर थकवणाऱ्या सर्वसामान्यांवर कारवाई करणाऱ्या पालिका प्रशासनाने कमला मिल, पेनिन्सुला कंपाऊंड, एनएससीआय अशा कोट्यवधींचा मालमत्ता कर थकवणाऱ्या संस्थांवर काय कारवाई केली, असे शिवसेनेचे नगरसेवक आशीष चेंबूरकर यांनी विचारले.

Web Title: Property tax in homeowners' names