मालमत्ता करासाठी 'सिटीझन पोर्टल' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

ठाणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने महापालिकेने एक नवे पाऊल टाकले आहे. रहिवाशांना आता मालमत्ता कराचे बिल सीटीझन पोर्टल या वेबसाईटद्वारे भरता येणार आहे. तसेच एम गव्हर्नस या प्रशासकीय ऍपचा शुभारंभदेखील शनिवारी करण्यात आला आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

ठाणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने महापालिकेने एक नवे पाऊल टाकले आहे. रहिवाशांना आता मालमत्ता कराचे बिल सीटीझन पोर्टल या वेबसाईटद्वारे भरता येणार आहे. तसेच एम गव्हर्नस या प्रशासकीय ऍपचा शुभारंभदेखील शनिवारी करण्यात आला आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

ठाणे महापालिकेच्या वतीने मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी ऑनलाईनची सेवा यापूर्वीच ठाणेकरांना उपलब्ध करून दिली आहे; परंतु आता यापुढे जाऊन सीटीझन पोर्टल नावाची वेबसाईटदेखील सुरू करण्यात आली आहे. या वेबसाईटवर जाऊन ठाणेकरांना स्वत:च्या मालमत्तेची माहिती भरता येणार आहे. तसेच ठाणे शहरातील प्रत्येक मालमत्ताधारक या पोर्टलवर मोबाईल रजिस्टर करू शकणार आहे. 

या पोर्टलद्वारे मालमत्ताधारक त्यांच्या मालमत्तेचा मालमत्ता कराचा तपशील पाहू शकणार आहेत. मालमत्ताधारक पोर्टलद्वारे त्यांचे कराचे बिल डाऊनलोड करू शकतील व याच पोर्टलद्वारे मालमत्ता करही भरू शकणार आहेत. तसेच कराचा भरणा केल्याची पावतीदेखील त्यांना याच पोर्टलद्वारे उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच प्रशासकीय कामकाजात सुधारणा आणण्यासाठीदेखील एम गव्हर्नस ऍपचा शुभारंभदेखील या वेळी करण्यात आला. या ऍपच्या माध्यमातून प्रत्येक प्रभाग समितीची माहिती एकाच वेळेस उपलब्ध होणार आहे. कोणत्या ठिकाणी किती वसुली झाली, याची रिअल टाईम माहितीदेखील उपलब्ध होणार आहे. 

मोबाइल व्हॅनचा शुभारंभ 

मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असल्याने याबाबतची रियल टाईम माहिती वरिष्ठ स्तरावर तत्काळ एका क्‍लिकवर कळणार आहे. याद्वारे महसुल वसुलीसंदर्भात वरिष्ठ स्तरावरील नियंत्रण प्रभावी राहणार आहे. मालमत्ता कर वसुलीचे वर्गीकरण आणि आवश्‍यक असल्यास उपाययोजना हे याद्वारे करता येणे शक्‍य होणार आहे.

मालमत्ता कर मोबाइल व्हॅनचा शुभारंभदेखील करण्यात आला. या व्हॅनच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीमध्ये ऑन टाईम वसुली होऊ शकणार आहे. तसेच भरलेल्या मालमत्ता कराचे बिलही तत्काळ उपलब्ध होणार आहे. याशिवाय एखाद्या सोसायटीमध्ये वसुलीचा मेळावा घ्यायचा झाल्यास, तेथेही या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ते करता येणार आहे. 
 

Web Title: For Property Tax launched Citizen Portal