BMC: स्थायी समितीच्या पटलावर महत्वाचा प्रस्ताव; रस्ते दुरुस्तीसाठी 443 कोटी

BMC
BMCsakal media

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर (BMC Election) रस्ते दुरुस्तीच्या (Road reparing work) कामांचा पाऊसच महानगरपालिकेच्या स्थायी समितीत (BMC Sthayi samiti) पडत आहे. यापूर्वी 1 हजार 815 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी मिळाल्यानंतर बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या प्रस्तावात (Proposal in sthayi samiti) 313 कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. कर पकडून हा खर्च 443 कोटी 16 लाखांवर जाणार आहे. (Proposal of road repairing work in sthayi samiti bmc)

BMC
इथे ओमिक्राॅन नाही का? मास्क कोण घालणार : एकनाथ शिंदे

यातून आरे कॉलनीतील रस्त्यासह 143 रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. आरे कॉलनीतील प्रत्येक किलोमिटरच्या रस्त्यांसाठी 3 कोटी 92 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. मुंबईतील 6 मिटर पेक्षा लहान तसेच काही मोठ्या रस्त्यांचे सिमेंट कॉक्रिटीकरण आणि डांबरी करण्याचे हे प्रस्ताव आहेत .यावर महानगरपालिका 313 कोटी 84 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

बुधवारी या प्रस्तावावर स्थायी समितीत निर्णय होणार आहे. पश्‍चिम उपनगरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महानगरपालिका 180 कोटी 39 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. तर, दक्षिण मध्य मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 94 कोटी 98 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. ही कामे दिड ते अडीज वर्षात पूर्ण हाेणार आहेत.

किलोमिटरसाठी 3 कोटी 92 लाख

गोरेगावच्या आरे वसाहतीतील पश्‍चिम द्रुतगती मार्गा पासून पवई येथील मोरारजी नगर पर्यंतचे सिमेंट कॉक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 38 कोटी 47 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. हा 9.8 किलोमिटर लांबीचा रस्ता असून त्याच्या प्रत्येक किलोमिटरच्या कॉक्रिटीकरणासाठी तब्बल 3 कोटी 92 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

BMC
राज्यपालांचं पत्र आलं...'विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य'

ए,डी,ई या तीन प्रभागातील पदपथांच्या दुरुस्तीचा प्रस्तावही स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. कुलाबा,फोर्ट,ग्रन्टरोड,वाळकेश्‍वर,भायखळा, या भागातील 19 पदपथांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यावर महानगरपालिका 18 कोटी 67 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.

पुन्हा कमी दराने निवीदा

महानगरपालिकेने एप्रिल महिन्यात रस्ते दुरुस्तीसाठी मागवलेल्या निवीदांमध्ये कंत्राटदाराने 30 टक्क्यांहून अधिक कमी खर्चात काम करण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे ती निवीदा प्रक्रिया रद्द करुन पालिकेने पुन्हा निवीदा मागवल्या.मात्र,आ ताही 13 ते 20 टक्के कमी दराने काम करणार होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com