सीसीटीव्हीला अखेर हिरवा कंदील 

सीसीटीव्हीला अखेर हिरवा कंदील 

नवी मुंबई - शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील कानाकोपऱ्यात तब्बल एक ४३९ सीसीटीव्ही लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सीसीटीव्हीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या पटलावर घेण्यासाठी सादर करून चार महिने उलटल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे शिवसेनेतर्फे संशय व्यक्त केला आहे.  

शहरातील रस्ते, प्रमुख चौक, बाजारपेठा, उद्याने, खाडीकिनारे, वाहतूक व्यवस्था आदी बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी तब्बल एक हजार ४३९ कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. हे कॅमेरे बसवण्यासाठी १५४ कोटी रुपये खर्च येणार आहे. 

या प्रस्तावावर चर्चा करताना शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी सीसीटीव्हीचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याची मागणी सभागृहात केली. महापालिकेने प्रस्तावात सादर केलेले सीसीटीव्ही कॅमेरेच्या दराबाबतही पाटकर यांनी शंका व्यक्त केली. तसेच काही लोकांना धनसंचय करण्यासाठी हा प्रस्ताव आणला असल्याचा टोलाही त्यांनी लागवाला; मात्र सीसीटीव्हीचा प्रस्ताव शहरासाठी उपयुक्त असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला. 

कोणते कॅमेरे लागणार
मुख्य चौकात, रस्त्यावर हाय डेफीनेशन कॅमेरे ९५४, मैदाने व बाजारपेठांच्या देखरेखीकरीता पीटीझेड कॅमेरे ३९६, धावत्या वाहनांची गती देखरेख करण्यासाठी स्पीडिंग कॅमेरे ८०, खाडी व समुद्रकिनारी देखरेखीसाठी थर्मल कॅमेरे ९ असे एकूण एक हजार ४३९ कॅमेरे बसवले जाणार आहेत.

सीसीटीव्हीचे श्रेय गणेश नाईकांना
नवी मुंबईकरीता मंजूर करण्यात आलेल्या सुमारे दीड हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून माजी मंत्री गणेश नाईक यांच्या स्मार्ट व्हिजनला देण्यात येत आहे. नवी मुंबई शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच होणाऱ्या गुन्हेगारी घटनांचा तत्काळ उकल व्हावी, याकरिता सीसीटीव्ही बसवण्याची गणेश नाईक यांची मूळ संकल्पना होती, असे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com