खोपोलीत अपंगांसाठी विशेष शाळा

खोपोली : बहुउद्देशीय इमारत व अपंग शाळेचे भूमिपूजन करताना नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसोबत सभापती व नगरसेवक.
खोपोली : बहुउद्देशीय इमारत व अपंग शाळेचे भूमिपूजन करताना नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसोबत सभापती व नगरसेवक.

खोपोली (बातमीदार) : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून खोपोलीत अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा निर्मितीचे भूमिपूजन करण्यात आले. नगरपालिका प्रभाग चारमध्ये अपंगांसाठी विशेष शाळेची इमारत बांधकामासाठी ७१ लाख, तर बहुउद्देशीय व्यापारी संकुल उभारण्यासाठी एक कोटी २५ लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे. या दोन्हीही उपक्रमांचे भूमिपूजन गुरुवारी (ता. ५) झाले.

खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक व सभापती मोहन औसरमल यांनी, अपंगांना निधी वाटप व अन्य कार्यक्रम सर्वच जण करत असतात; पण आम्ही तसे न करता खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून अपंगांना विशेष शाळेची इमारत बांधून देणार आहोत. खोपोलीतील अपंग विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिक्षणाची दारे खुली करून त्यांना पुढील आयुष्यात स्वावलंबी होण्याचा मार्ग निर्माण करणार आहोत, असे उद्‌गार काढले. 
मुख्याधिकारी गणेश शेटे यांनीही आपल्या भाषणात अपंगांना नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वोत्तम मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच या शाळा इमारतीचे काम लवकरात लवकर उत्तम दर्जा राखून पूर्ण करून द्यावे, अशी सूचना ठेकेदाराला केली. या वेळी बहुउद्देशीय व्यापारी संकुल याचेही भूमिपूजन करण्यात आले. या दोन्ही कामांसाठी नगरपालिकेच्या वतीने १ कोटी ९६ लाख रुपयांचा निधीची तरतूद केली आहे. 

या वेळी मुख्याधिकारी शेटे यांनी प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक मनीष यादव आणि नगरसेविका माधवी रिठे यांनी या शाळेला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आभार लक्ष्मण ऊर्फ तात्या रिठे यांनी मानले. याप्रसंगी मुख्याधिकारी गणेश शेटे, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे-औटी, आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे, शिक्षण सभापती केविना गायकवाड, परिवहन सभापती मोहन औसरमल, नगरसेवक मनीष यादव, किशोर पानसरे, नगरसेविका माधवी रिठे, वैशाली जाधव, मानसी काळोखे, जीनी सॅम्युएल, ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख, ताराराणी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा वर्षा मोरे, माजी नगरसेविका कुसुम रावळ, केटीएसपी मंडळ सदस्य भास्कर लांडगे, माध्यमिक विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत केदारी, नगरपालिका उपनगर अभियंता नामदेव लगाडे, अरुण बेंद्रे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com