वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या दलाल महिलेस अटक

वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या दलाल महिलेस अटक

ठाणे : पैशांचे आमिष दाखवून गरजू महिलांना वेश्‍याव्यवसाय करायला लावणाऱ्या 35 वर्षीय महिलेस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली.

रेणुका शिंदे असे या महिलेचे नाव असून, तिच्या तावडीतून तिघी पीडित महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई मॉडेला चेक नाका येथील गोपालाआश्रम बार आणि रेस्टॉरंटमध्ये करण्यात आली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घोडबंदर रोडवरील ओवळा नाका येथे राहणारी रेणुका काही गरीब आणि गरजू महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून शरीरविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी मॉडेला चेक नाका येथील गोपाळआश्रम बार आणि रेस्टॉरंटमध्ये सापळा रचून दलाल महिलेस अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com