मुबई : कोव्हिड-19 महामारीच्या काळात वैद्यकीय सेवा सुरू ठेवणाऱ्या खासगी डॉक्टरांना पीपीई किटचे संरक्षण मिळणार आहे. शहरातील कंटेनमेंट झोन आणि नजीकच्या परिसरात खासगी दवाखाने सुरू ठेवलेल्या डॉक्टरांना ही सुविधा मिळेल. रुग्णवाहिका चालक आणि सहायक (क्लीनर) यांनाही पीपीई किट देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
कोरोनाच्या संकटातही अनेक खासगी डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा सुरू ठेवली आहे. परंतु, संरक्षक किट नसल्यामुळे अनेक डॉक्टरांनी संसर्ग होण्याच्या भीतीने दवाखाने, रुग्णालये बंद ठेवली. महापालिकेने पीपीई किट उपलब्ध करावेत, अशी मागणी खासगी डॉक्टरांकडून होत आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाने खासगी डॉक्टर, रुग्णवाहिका चालक आणि सहायकालाही पीपीई किट पुरवण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या रुग्णांसाठी अधिक रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकतील.
लॉकडाऊनच्या काळात रुग्णवाहिका मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत. रुग्णवाहिका मिळण्यास उशीर लागल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोव्हिड रुग्णांसाठी बेस्ट उपक्रमाच्या 72 मिनी बसचे रूपांतर तात्पुरत्या रुग्णवाहिकेत करण्यात येणार आहे.
प्रभाग अधिकाऱ्यांना निर्देश
महापालिका प्रशासनाने सर्व 24 प्रभाग अधिकाऱ्याना अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्समधून पीपीई किट उचलण्याचे निर्देश दिले आहेत. गरजेनुसार अधिक पीपीई किटसाठी मागणी नोंदवा. प्रत्येक आठवड्याला पीपीई किट वाटण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगितले आहे.
Protection of PPE to private doctors
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.