मुंबईतील प्रभादेवीत कोसळली संरक्षक भिंत..

शैलेश नागवेकर 
शनिवार, 11 जानेवारी 2020

प्रभादेवीत भिंत कोसळून गाड्यांचे नुकसान. हातिसकर वाडीतील घटना, सुदैवाने जिवित हानी नाही 

मुंबई - मुंबई महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून जाहीर करूनही प्रभादेवीतील हातिसर वाडीला लागून असलेली संरक्षक भिंत आज दुपारी कोसळली त्यामुळे बाजुच्या आदीश सोसायटीतील तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जिवतहानी झाली नाही. 

हातिसकर वाडीच्या पूर्नविकासाचे काम सूमार दहा वर्षांपासून सुरु झाले होते, अर्धी इमारत तयार होऊन तिचे बांधकाम थांबूनही अनेक वर्षे झालेली आहेत या दरम्यान बांधण्यात आलेल्या "ट्रांझिस्ट कॅम्प'चीही मुदत संपलेली आहे. कमकूवत झालेला हा ट्रांझिस्ट कॅम्प धोकादायक असल्याची नोटीस महापालिकेने गतवर्षी दिली होती. 

महत्त्वाची बातमी - 'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ?

कमकूवत झालेल्या या ट्रांझिस्ट कॅम्पला लागून असलेल्या आदीश इमारतीच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर कॅम्पच्या खिडक्‍यांच्या काचा अधुनमधून पडत असतात. वारंवार त्याबाबत सुचनाही करण्यात आलेल्या होता, परंतु त्याची दखल हातिसकर वाडी पूर्नविकासकांनी घेतलेली नाही. कॅम्पमधील सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे पाया खचलेली भिंत आज कोसळली. एरवी येथे गाड्या पार्क केलेल्या नसल्यामुळे लहान मुले खेळत असतात. 

Image may contain: one or more people and outdoor

ड्रेब्रिज कोण उचलणार? 

भिंत कोसळल्यानंतर आदीश इमारतीलील रहिवाशांनी लगेचच अग्निशमनद, दादर पोलिस आणि महापालिकेला कळवले. स्थानिक नगरसेवक हेमांगी वरळीकरही उपस्थित झाल्या होत्या. नुकसान झालेल्या गाड्या हलवण्यात आल्यानंतर उर्वरित भिंत पाडण्यात आली. आणि त्याचे ड्रेब्रिज तेथेच टाकण्यात आले. जी-साऊथचे कनिष्ठ अभियंता सोनावणे यांना विचारले असता तुम्ही पुढच्या अधिकाऱ्यांना फोन करा आणि त्यांना सांगा असे सांगत होते. परिणामी नुकसान होऊनही आता आदीशमधील रहिवाशांना येण्या-जाण्याच्या रस्त्यात ड्रेबिजचा हकनाक त्रास होत आहे. 

महत्त्वाची बातमी  तीर रपकन घुसला तिच्या मानेत, लागलेला तीर एक दिवस मानेतच

कायमस्वरुपी उपाययोजना हवी 

या ट्रांझिस्ट कॅम्पचा हकनाक त्रास आम्हाला होत आहे. या कॅम्पचा कोणताही भाग किंवा त्याच्या बाजूला अर्धवट अवस्थेत असलेल्या इमारीतीच्या वीटा पडून जिवित हानी होऊ शकते त्यामुळे कायमस्वरुपी तोडगा हवा अशी मागणी आदीश इमारतीलील रहिवाशी करत आहेत.  

WebTitle: protective wall collapsed in prabhadevi mumbai fortunately no casualty 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protective wall collapsed in prabhadevi mumbai fortunately no casualty