मुंबईत वीज बील गोंधळाविरोधात आंदोलन; मराठी भारती संघटनेचं धरणे आंदोलन.. 

तेजस वाघमारे 
रविवार, 12 जुलै 2020

ऐन लॉकडाऊनच्या काळात लोकांचे रोजगार गेले असतानाच महावितरण कंपनीने ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठवले आहे.

मुंबई : ऐन लॉकडाऊनच्या काळात लोकांचे रोजगार गेले असतानाच महावितरण कंपनीने ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठवले आहे. याविरोधात मराठी भारती संघटनेने विरार पूर्व येथील बरफपाडा येथे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात नागरिकांनी वाढीव वीज बील दाखवत त्याचा निषेध केला.

हेही वाचा: मुंबईत आज कोरोनाचे तब्बल 'इतके' रुग्ण; जाणून घ्या आजची  कोरोना आकडेवारी.

लॉकडाऊनमुळे लोकांना रोजगार नाही अशातच भरमसाठ रकमेची वीज बिल महावितरण कंपनीने पाठवले आहे. हे बिल भरणे लोकांना शक्य नाही त्यामुळे गरीब- मध्यम वर्गाचा विचार करून 200 युनिट पर्यंत मोफत वीज आणि 200 युनिट पेक्षा अधिक बिलात 50% सूट द्यावी, अशी मागणी अध्यक्ष ऍड. पूजा बडेकर ह्यांनी केली आहे.

हेही वाचा: सावधान! 'या' प्रकारच्या कोविड रुग्णांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांचा धक्कादायक निष्कर्ष..

भरमसाठ वीज बिलामुळे नागरिकांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. सरकारने याचा गंभीरपणे विचार करून गोरगरिबांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेच्या कार्याध्यक्ष विजेता भोनकर यांनी यावेळी केली. 

हेही वाचा: मुंबईकरांनो सावधान! पुढचे ३ दिवस अनावश्यक घराबाहेर पडू नका; 'हे' आहे कारण..   

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणात लवकरात लवकर लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा मराठी भारती संघटना घंटानाद आंदोलन करेल असा इशाराही संघटनेने दिला.

संपादन : अथर्व महांकाळ 

protest against increased electricity bills in mumbai 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest against increased electricity bills in mumbai