महापोली कडकडीत बंद; आसिफा अत्याचार विरोधात कँडल मार्च

दीपक हीरे
रविवार, 22 एप्रिल 2018

वज्रेश्वरी- जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उन्नाव व देशातील चिमुरडयांवर बलात्कार घटनेच्या निषेधार्थ भिवंडी तालुक्यातील महापोली या ग्रामीण भागात येथील ग्रामस्थांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापोली गाव आज कडकडीत बंद ठेऊन या घटनेच्या निषेधार्त कँडल मार्च काढून गुन्हेगाराना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली.

भिवंडी तालुक्यातील महापोली या गावी राष्ट्रवादी कांग्रेस चे इरफान भूरे, उपसरपंच उबेद हलबे, दादा पटेल, जैद पटेल, फरहान पटेल, इमरान पटेल, नोशाद पटेल(सर), नईम भूरे,अद्नान भाबे,इरफान शेख, नइद सुसे आदि सह येथील ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित राहून असिफ़ा या चिमुरडीवर झालेल्या बलात्कार चा निषेध केला.

यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष इरफान भूरे यानी तीव्र शब्दात सरकार वर टिका करून गुन्हेगाराला हे सरकार पाठीशी घालत असून राज्यकर्ते जबाबदार असल्याचे सांगितले व गुन्हेगाराना लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी कँडल मार्च मधे हजारोच्या संख्येने ग्रामस्थ व अनेक लहान मूली सहभागी झाले होते.

यावेळी हातात मेणबत्ती व निषेधचे फलक घेउन या मार्च मध्ये ग्रामस्थ सहभागी झाले मोदी सरकार विरोधात घोषणा बाजी करून रोष व्यक्त करण्यात आला. या घटनांचा निषेध करण्यासाठी हा मार्च काढण्यात आल्याचे महापोली ग्रामस्थ कडून सांगण्यात आले असून महिला व मुलीवरिल अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सरकारने त्वरित उपाय योजना राबवाव्यत तसेच पीड़ित मुलींना न्याय मिळवून गुन्हेगारांना फाशी देण्याची मागणी या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.

Web Title: protest for asifa in mahapoli