पत्रकारांवरील बेकायदेशीर कारवाई विरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन

mumbai
mumbai

मुंबई :  पालघर जिल्ह्यतील पत्रकार हुसेन खान आणि राम परमार यांना 21 जूनला वृत्तांकन करताना, पालघर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तौफिक सैयद यांनी मोबाईल हिसकावून घेत मारहाण करून कोठडीत डांबले. त्यानंतर पहाट सहाच्या सुमारास पत्रकार राम परमार यांच्या घरात घुसून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला. या विरोधात जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी मोर्चा काढला. त्यानंतर नागपूर अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई आणि संबंधित पत्रकरांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री तसेच गृहराज्यमंत्री केसरकर यांना निवेदन दिले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी 16 जूनला औचित्याच्या मुद्द्या दरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश दिले. मात्र जुलै  महिन्यानंतर कोणतीही कारवाई झालेली नाही. हुसेन खान व राम परमार यांच्या बेकायदेशीर अटकेस जबाबदार पोलीस अधिकारी किरण कबाडी व तौफिक सैयद यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी, दोघांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत. 353 कलम अंतर्गतची नवीन तरतूद रद्द करण्यात यावी या मागणीसाठी पालघर जिल्हा पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर्स असोसिएशन, द प्रेस क्लब ऑफ वसई, मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हा, वसई विरार महानगर पत्रकार संघ यांच्या वतीने हे धरणे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com