हैदराबाद घटनेचा खोपोलीत निषेध

खोपोली : डॉ. प्रियंका रेड्डी बलात्कारप्रकरणी निषेध रॅली काढण्यात आली.
खोपोली : डॉ. प्रियंका रेड्डी बलात्कारप्रकरणी निषेध रॅली काढण्यात आली.

खोपोली (बातमीदार) : हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेला बलात्कार, त्यानंतर त्यांची झालेली हत्या या संतापजनक घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. बलात्कारी व्यक्तींना समाजासमोर फाशी देण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.

खोपोली शहरातही डॉ, प्रियंका रेड्डी यांच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा तत्काळ देण्यात यावी, देशात व राज्यात महिला आणि तरुणींना पूर्ण संरक्षण मिळण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी गुरुवारी निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत येथील विविध शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला बचत गट कार्यकर्त्या, विविध सामाजिक संस्था कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली काढण्यासाठी येथील मैत्री सामाजिक बांधिलकी संस्था, वनिता महिला मंडळ, वेद सह्याद्री, ज्येष्ठ नागरिक बचत गट, शीळफाटा महिला मंडळ यांनी पुढाकार घेतला होता. शीळफाटा ते खोपोली पोलिस ठाणे अशी ही रॅली काढण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com