कांजूर कारशेडला छुपा विरोध म्हणजेच राजकीय अजेंडा; पर्यावरणवादी स्टॅलिन दयानंद यांची प्रतिक्रिया

कांजूर कारशेडला छुपा विरोध म्हणजेच राजकीय अजेंडा; पर्यावरणवादी स्टॅलिन दयानंद यांची प्रतिक्रिया

मुंबई :  कांजूरमार्गचा पर्याय मेट्रोसाठी सर्वात योग्य पर्याय आहे. कांजूरमार्गच्या जागेवर झाडं नाहीत, जैवविविधतेच्या दृष्टीने हा कमी महत्त्वाचा आणि सरकारच्या ताब्यात असलेला भूखंड आहे. सरकारला तो मोफत उपलब्धही आहे. मात्र काही लोकं या कारशेडला  छुपा विरोध करत असून राजकीय अजेंडा राबवत असल्याचे 'वनशक्ती' संस्थेचे प्रमुख स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले. आरेमध्ये मेट्रो कारशेडच्या उभारणीविरुद्ध कोर्टात याचिका करणाऱ्यांपैकी स्टॅलिन एक आहेत. 
कांजूरमार्ग येथील जागेच्या मालकीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये  जुंपली आहे. कांजूर येथे काम सुरू करण्यास केंद्र सरकारने आक्षेप घेत राज्य सरकारला याबाबत पत्र ही लिहीले होते. मात्र ती जागा राज्य सरकारचीच असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.यानंतर ही काही लोकांनी कांजूर येथील जागेला छुपा विरोध करण्यास सुरू वात केली असल्याचे स्टॅलिन सांगतात. मात्र यापैकी कुणीही समोर येऊन भुमिका मांडत नाहीत. याजागेवरून पर्यावरणवाद्यांबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरवणे सुरू असून यामागे कुटील डाव असल्याचा संशय ही स्टॅलिन यांनी व्यक्त केला आहे. कांजूरच्या जागेवरील एकूण सद्यस्थितीबाबत याबाबत आपण लवकरच आरटीआयच्या माध्यमातून माहीती मागवणार असल्याचे ही स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.

आरेमधील नैसर्गिक साधनसामग्री ही मुंबईचे फुप्फूसे आहेत. माणसाच्या आयुष्यात फुफ्फूसांचे जे महत्व आहे तेच महत्व मुंबईसाठी आरेचं आहे. फुफ्फूस वाचल्याचा जो आनंद असतो तोच आनंद झाल्या असल्याची प्रतिक्रीया पर्यावरणवादी झोरू बोथेना यांनी दिली. त्यामुळे आम्ही मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयाचं आम्ही सागत केल्याचा पुनरूच्चार ही बोथेना यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने मेट्रो-3 आणि मेट्रो-6 ची कारशेड एकत्र उभी राहिल. यामुळे  या दोन्ही मार्गांची उपयुक्तता यामुळे आणखी वाढेल असंही झोरू नमूद करतात. ही मेट्रो आता कुलाबा-सीप्झ-कांजुरमार्ग मेट्रो बनली आहे. ज्यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक पर्याय मिळेल यामुळे लोकांच्या सुविधेसह मुंबईच्या वाहतूक कोंडीतून ही मार्ग निघेल असं ही त्यांना वाटते. 

मेट्रो 3 आणि मेट्रो 6 साठी दोन वेगवेगळ्या कारशेड ऊभारण्य़ात येणार होत्या. आता दोन कारशेडऐवजी एकच  कारशेड उभारणार असल्याने ऐंशी हेक्टरऐवजी चाळीस हेक्टरमध्येच दोन्ही कारशेड उभी राहीतील. यामुळे चाळीस हेक्टर जमीन वाचणार असून त्यावरील नैसर्गीक साधनसामग्री ही वाचणार आहे. त्यामुळे काजूरची जागाच कारशेडसाठी योग्य असल्याचे झोरू यांना वाटते.

protests to Kanjur carshed Reaction of environmentalist Stalin 

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com