स्टेशन मास्तरांनी पाळला निषेध दिवस!

रविंद्र खरात 
मंगळवार, 1 मे 2018

कल्याण : देशभरातील रेल्वे स्थानकात काम करणाऱ्या स्टेशन मास्तरांच्या विविध मागण्यासाठी आज (मंगळवार) कामगार दिनाचे औचित्य साधून ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनच्या वतीने निषेध दिवस पाळण्यात आला.

यात मध्य रेल्वेच्या कल्याणसह अनेक रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर यांनी आज कामावर हजर राहत शर्टाला बिल्ला लावत रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

देशभरात 39 हजारपेक्षा जास्त रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तर काम करत आहेत . त्यांना 8 तास ऐवजी 12 तास काम करावे लागत आहे. पदोन्नती नाही, ज्या जागा जाहीर झाल्या तेथे नियुक्ती नाही, आठवड्यात एक दिवशी सुट्टी हवी मात्र ती ही दिली जात नाही, गणवेश खरेदीसाठी पैसे मंजूर असताना ते दिले जात नाही , अशा विविध मागण्या आणि समस्यामुळे देशातील रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर मानसिक तणावात काम करत आहेत.

या मागण्यांसाठी स्टेशन मास्तर यांच्या ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनने रेल्वे मंत्रालय ते स्थानिक रेल्वे प्रशासनाकडे मागण्या केल्या; मात्र त्याला केराची टोपली दाखवली. याचा निषेध म्हणून कामगार दिनाचे औचित्य साधून देशभरातील रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर यांनी कामावर हजर राहत शांततापूर्ण शर्टाला बिल्ला लावत रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

यात मध्य रेल्वेच्या कल्याणसह अनेक रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशन मध्य रेल्वे डी एस अरोरा यांनी 'सकाळ'ला दिली.

Web Title: Protests by Station Master of Indian Railways