esakal | शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्याच्या वैद्यकीय अहवाल प्रती कुटूंबियांना द्या;उच्च न्यायालयाचे निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्याच्या वैद्यकीय अहवाल प्रती कुटूंबियांना द्या;उच्च न्यायालयाचे निर्देश

शहरी नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले सामाजिक कार्यकर्ते वेर्णन गोन्साल्विज, प्रा सुधा भारद्वाज आणि आनंद तेलतुंबडे यांच्या वैद्यकीय अहवालाच्या प्रती त्यांच्या कुटुंबियांना द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्याच्या वैद्यकीय अहवाल प्रती कुटूंबियांना द्या;उच्च न्यायालयाचे निर्देश

sakal_logo
By
सुनिता महामुणकर

मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले सामाजिक कार्यकर्ते वेर्णन गोन्साल्विज, प्रा सुधा भारद्वाज आणि आनंद तेलतुंबडे यांच्या वैद्यकीय अहवालाच्या प्रती त्यांच्या कुटुंबियांना द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी जीवक रोबोट दाखल; डॉक्टरांचाही धोका होणार कमी

कोरोना साथीच्या पाश्वभूमीवर तिघांनीही न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. तिघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. याबाबत दाखल झालेला वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना पाहण्याचा अधिकार आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

सार्वजनिक मालवाहतूकदारांना दिलासा; राज्यसरकारकडून 700 कोटींची करमाफी

कारागृहात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे, त्यामुळे धोका टाळण्यासाठी जामीन मंजूर करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे. एनआयएने जामीनाला विरोध केला आहे. यावर ता. 28 रोजी सुनावणी होणार आहे.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top