esakal | नवदुर्गा महोत्सवानिमित्त पोषण आहार जोगवा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नवदुर्गा महोत्सवानिमित्त पोषण आहार जोगवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माणगाव : नवदुर्गा महोत्सवानिमित्त शिरवली साजे आदिवासीवाडी येथे नवदुर्गा महोत्सव अंतर्गत जोगवा कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत पोषण आहार माहिती व जागृती करण्यात आली. यामध्ये विविध चित्र कृतीतून व मानवी देखाव्यातून पोषण आहारसंबंधी माहिती देण्यात आली.

हेही वाचा: स्टोन आर्टतून साकारले पंतप्रधान मोदींचे चित्र

कुपोषणामुळे होणारे विविध आजार व पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगण्यात आले. बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफ्फुल बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका सीमा ठाकरे यांच्या नियोजनातून अंगणवाडीसेविका विजयश्री सावंत, मदतनीस मानसी काटकर यांच्या प्रयत्नाने जोगवा कार्यक्रम अत्यंत उत्साहात झाला. जोगवा कार्यक्रमातून पौष्टिक आहाराची माहिती मिळाल्याबद्दल शिरवली आदिवासीवाडीवरील महिलांनी आभार मानले,

loading image
go to top