दुष्काळी भागातील खाजगी दवाखाने शेतकऱ्यांसाठी मोफत करा : हम भारतीय पार्टी 

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा भारत देशातील सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे. परंतु त्यांचे हाल पाहवले जात नाही. पाऊस नाही, पिकाला भाव नाही, अठरा विश्व दारिद्रय व कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पार निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराई, साथीचे रोग बळावत असून लहान लेकरे व वयोवृध्द आजारी पडण्यात लक्षणीय वाढ झालेली आहे.

सरकारी दवाखान्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी शासकीय सेवा सोडून खाजगी दवाखाने सुरु केले आहेत. परंतु शेतकऱ्यांना खाजगी दवाखान्यात जायचे म्हटले की, भीती वाटते, कारण तपासणी फी 200/- रू व मेडिसीन 500/- लॅब 300/- म्हणजे एका वेळी एक हजार रूपये हाताशी लागतात. रुग्णास अॅडमीट केले तर विचारूच नका. हा पैसा येणार कुठून? यामुळे सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा व तात्काळ दुष्काळग्रस्त भागातील खाजगी दवाखाने शेतकऱ्यांसाठी मोफत करावेत व शेतकऱ्यांची होणारी आर्थिक हेळसांड थांबवावी. अशी मागणी हम भारतीय पार्टीचे अध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली आहे.तर या मागणीस अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी पाठींबा दिला असून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची काळजी घ्या.  खाजगी दवाखाने मोफत करा, नाहीतर शेतकरी पैश्या अभावी आजारपण अंगावर काढीत आहे व त्यामूळे अनर्थ घडेल म्हणून डाँक्टरांची तपासणी फी व लँब मोफत करावे व त्यासाठी सरकारनी योग्य ती पावले उचलावीत.

सरकारने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी हम भारतीय पार्टीचे अध्यक्ष अमोल शिंदे, उपाध्यक्ष डॉ. वंदना बेंजामिन, मुंबई अध्यक्ष अँण्ड्रू फर्नांडीस, रोमीयो,संजय उरणकर,सुयोग हिवाळे,उर्मिला अमर,ठाणे जिल्हा अध्यक्ष एस.माने, पालघर अध्यक्ष शितलकुमार डेव्हिड,सचिव विल्यम चंदनशीव,आनंद म्हांळूगेकर, संजय उरणकर,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डँनिएल काळूखे,राज एडके,प्रकाश शेरेकर,प्रकाश बेंजामिन,विठ्ठल गायकवाड,सांगली जिल्हाअध्यक्ष आशिष कच्छी,अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केली आहे.

Web Title: provides free hospital in villages to farmers in drought area demands hum bharti