दहिसर, पोयसर, ओशिवरा नद्यांना लवकरच नवजीवन

दहिसर, पोयसर, ओशिवरा नद्यांना लवकरच नवजीवन

मुंबई - दहिसर, पोयसर आणि ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेने पावले उचलली असून, यंदाच्या अर्थसंकल्पात पाच कोटी 20 लाखांची तरतूद केली आहे. या तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत राज्य सरकार अहवाल तयार करीत आहे. या कामासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. 

नद्यांच्या प्रदूषणाला आळा, पात्राचे रुंदीकरण, पाण्याची गुणवत्ता सुधारणे आदी कामे महापालिका हाती घेणार आहे. दहिसर, पोयसर आणि ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले जाणार आहे. पाणलोट क्षेत्रातून नदीत होणारे प्रदूषण रोखणे, मलनि-सारण वाहिन्यांचे जाळे, नदीकाठावरील रस्ते आदी कामांचा समावेश आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच ही कामे टप्प्या-टप्प्याने केली जातील, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा अंतर्भाव काही वर्षांपासून अर्थसंकल्पात केला जात होता. आता निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या कामाला गती दिली जाईल, असे सांगण्यात आले. 

मिठी नदीचे सौंदर्यीकरण 
मिठी नदीचे सौंदर्यीकरण व मलनि:सारण समस्येचा व्यवस्थापन आराखडा महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. हे काम चार भागांत केले जाईल. सेवा रस्त्याचे बांधकाम केले जाणार असून, नदीचा प्रवाह वळवून आठ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा मलजल प्रक्रिया केंद्रात आणला जाईल. "फ्लड गेट' बांधण्यासाठी 71 कोटी रुपये खर्च होणार आहेत. बापट नाला व सफेद पूल नाला येथील घाटकोपर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट यंत्रणेपर्यंत नवीन बोगदा बांधला जाणार आहे. त्यासाठी 270 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात 135 कोटींची तरतूद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com