पीएसआयला पाच हजारांची लाच घेताना अटक

अच्युत पाटील
शनिवार, 30 जून 2018

वाणगांव पोलिस स्टेशन हद्दीत पोस्को गुह्यात अडकलेली आरोपीची गाडी सोडविण्यासाठी वाणगांव पोलिस स्टेशनचे पीएसआय वाघ यांना पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

बोर्डी : वाणगांव पोलिस स्टेशन हद्दीत पोस्को गुह्यात अडकलेली आरोपीची गाडी सोडविण्यासाठी वाणगांव पोलिस स्टेशनचे पीएसआय वाघ यांना पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

सदर गुन्हात पीएसआय वाघ यांनी वाहन सोडविण्यासाठी दहा हजारांची मागणी आरोपीकडे केली होती. आरोपीने याबाबतची माहिती लाचलुचपत विभागाला दिल्यानंतर सापळा रचून लाचखोर पीएसआय वाघ यांना वाणगांव पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी सायंकाळी पकडण्यात आले. लाचलुचपत विभाग पालघर पीआय वाघमारे यांच्या टिमने ही कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यात हप्तेखोर पोलिसांविरुद्ध अनेकदा तक्रारी होत असूनही अशा पोलिसांना पालघर पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी अनेकदा पाठीशी घातले आहे. यामुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा भ्रष्ट व कुचकामी ठरत असल्याने गुन्हेगारीही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. गृहविभाग स्वत:च्या खिशात ठेवणारे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस पालघर जिल्ह्याची पोलिस यंत्रणेची विस्कटलेली घडी सुधारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

Web Title: PSI caught while taking bribe