उपेंद्र भट यांना "कंठ संगीत' पुरस्कार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या "राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2016'ची यादी नुकतीच जाहीर झाली. "कंठ संगीत' पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित उपेंद्र भट यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, शाल, प्रमाणपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाट्य, तमाशा, नृत्य, कंठ संगीत, कीर्तन, कलादान, वाद्यसंगीत, शाहिरी, उपशास्त्रीय संगीत, चित्रपट, लोककला व आदिवासी गिरिजन कला या क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात. 

भट हे पंडित भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ पट्टशिष्य आहेत. गुरूंप्रमाणेच भट यांचे संगीत क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत, भावगीत, रागनिर्मिती, संतवाणी, हिंदी द्वंद्वगीते असे अनेकविध पैलू त्यांच्या गायनाला आहेत. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भट यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या "भीमसेनी' गायकीला मिळालेला हा पुरस्कार असल्याचे मी मानतो, अशा शब्दांत भट यांनी भावना व्यक्त केल्या. 

Web Title: pt upendra bhat award