उल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण

दिनेश गोगी
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

उल्हासनगर :1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक शौचालय बनवण्यात आले असून त्याचे लोकार्पण खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

उल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक शौचालय बनवण्यात आले असून त्याचे लोकार्पण खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

स्थानकाची निर्मिती झाल्यावर प्लॅटफॉर्म दोनवर 1969 साली शौचालय बांधण्यात आले होते. मात्र प्लॅटफॉर्म एकवर शौचालयाची सुविधा नसल्याने प्रवाशांना रूळ ओलांडून किंवा जिन्यावरून प्लॅटफॉर्म दोन गाठावे लागत होते. दोन वर्षांपूर्वी सरकत्या जिन्याचे उदघाटन करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी त्यांच्या राखीव निधीतून प्लॅटफॉर्म नंबर एकवर सार्वजनिक शौचालयाच्या कामाची सुरवात केली. या सुसज्ज शौचालयाचे काम पूर्णत्वास आल्यावर डॉ. शिंदे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.

कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ.बालाजी किणीकर, सुभाष भोईर, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, दिलीप गायकवाड, अरुण आशान, महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख जयकुमार केणी,युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे,सुमित सोनकांबळे,शहर संघटक सागर उटवाल, नगरसेविका ज्योती माने, सुरेखा आव्हाड, विभागप्रमुख शाखाप्रमुख व शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्लॅटफॉर्म नंबर दोनवरील शौचालय वर्ष जुने झाले असून ते निष्काशित करून प्लॅटफॉर्म एकवरील सुसज्ज शौचालयाप्रमाणे उभारणी करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Web Title: Public toilets opening at the railway station of Ulhasnagar