पीयूसी केंद्र आता ऑनलाईन

puc
puc

मुंबई : राज्यातील वाहनांची प्रदूषण नियंत्रणाची चाचणी करणारे पीयूसी केंद्र आता ऑनलाईन होणार आहे. यापूर्वी पीयूसी कागदोपत्री केल्या जात असल्याने त्यात बनावटगिरी केली जात होती. त्यामुळे आता पीयूसी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक वाहनांची माहिती "परिवहन वाहन' या पोर्टलवर ऑनलाईन भरण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) दिले आहे. 

रस्त्यावर जागोजागी थाटण्यात आलेल्या पीयूसी केंद्रांना परिवहन विभागाच्या ऑनलाईन प्रणालीशी जोडण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला होता. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन पीयूसी केंद्राची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, अद्याप महाराष्ट्रात यासंदर्भातील ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. पीयूसी चालकांकडे पुरेशे प्रशिक्षित मनुष्यबळ आणि यंत्रणा नसल्याने पीयूसीचालकांनी ऑनलाईन सेवेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने वाढते प्रदूषण लक्षात घेता पीयूसी केंद्र ऑनलाईन करण्याचे आदेश दिले होते. 

पीयूसी चालकांना वाहनांची पीयूसी चाचणी केल्यानंतर सर्व माहिती वाहन प्रणालीवर अपलोड करावी लागणार आहे. तसेच वाहनधारकाला देण्यात येणारे प्रमाणपत्रदेखील "वाहन' प्रणालीवर अपलोड करावे लागेल. 
--------- 
ऑनलाईन पीयूसीचे दर (रुपयांत) 
दुचाकी : 35 
पेट्रोलवरील तीनचाकी वाहन : 70 
पेट्रोल, सीएनजीवरील वाहन : 90 
डिझेलवरील वाहने : 110 

--------------- 
मार्च 2020 नंतर प्रभावी अंमलबजावणी 
सध्या ऑनलाईन प्रणालीची सुरुवात झाली असली तरी जुन्या पीयूसीसुद्धा ऑनलाईन करण्याची सुरुवात केली आहे. मार्च 2020 पासून पीयूसी ऑनलाईन देण्याबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेशही परिवहन आयुक्तांनी राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com