शंभर महाविद्यालयांत पुढील वर्षी "पुल महोत्सव' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

मुंबई - पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व तरुणांपर्यंत पोचावे यासाठी पुढील वर्षापासून 100 महाविद्यालयांत "पुल महोत्सव' साजरा केला जाईल. पु. ल. अकादमीपुरताच तो मर्यादित ठेवला जाणार नाही, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. 

पु. ल. देशपांडे कला अकादमी आयोजित महोत्सवाचे उद्‌घाटन मंगळवारी प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात तावडे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे, ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम, प्रतिमा मतकरी, अकादमीचे प्रभारी संचालक संजय पाटील, पुरुषोत्तम लेले या वेळी उपस्थित होते. सांस्कृतिक खात्याने अरुण काकडे, यशवंत देव आदी महनीय व्यक्तींच्या दृक्‌श्राव्य मुलाखती घेण्याचे ठरवले असून, हे काम सुरू झाले आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली. 

चित्रपटांच्या दुर्मिळ पोस्टरचे प्रदर्शन 

कॅमल फिल्म या संस्थेने चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांच्या जुन्या-दुर्मिळ पोस्टरचे प्रदर्शन पुल कला महोत्सवाच्या निमित्ताने कलादालनात भरवले आहे. "सिकंदर', "एक रात', "1987', "प्रेम संगीत', "सफर', "मिस्टर ऍण्ड मिसेस 55' आदी चित्रपटांची पोस्टर येथे पाहता येतील.

Web Title: pu.la. festival will oraganise in more than 100 colleges