महिलेची पर्स खेचून चोरट्याचे पलायन

महिलेची पर्स खेचून चोरट्याचे पलायन
महिलेची पर्स खेचून चोरट्याचे पलायन

नवी मुंबई : लोकलच्या दरवाजात उतरण्यासाठी उभ्या असलेल्या एका महिलेच्या हातातील पर्स रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या चोरट्याने खेचून पलायन केले. ही घटना रविवारी रात्री सानपाडा रेल्वेस्थानकात घडली.  

तक्रारदार महिला हरजित कौर हरजित सिंग माटा (वय ६२; रा. घणसोली) या रविवारी दुपारी मुंबईत कामानिमित्त गेल्या होत्या. त्यानंतर त्या रात्री ९ च्या सुमारास जीटीबी रेल्वेस्थानकावरून नवी मुंबईत परतत होत्या. ती लोकल रात्री पावणेदहाच्या सुमारास सानपाडा रेल्वेस्थानकात आल्यानंतर जुईनगर येथे उतरण्यासाठी हरजित कौर लोकलच्या दरवाजात येऊन उभ्या राहिल्या. सानपाडा रेल्वेस्थानकातून लोकल जुईनगरच्या दिशेने सुटल्यानंतर रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या चोरट्याने हरजित कौर यांच्या हातातील रोख रक्कम आणि इतर कागदपत्रे असलेली पर्स खेचून पलायन केले. घटनेनंतर त्यांनी वाशी  रेल्वेस्थानकातील पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. त्यानुसार वाशी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com