मुलेच उलगडणार पित्याचा प्रवास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पुणे - कपूर घराण्यात जन्म घेऊनही "छोटी-छोटी कामे करतच मोठे व्हा' अशी वडिलांनी दिलेली शिकवण घेऊन राज कपूर यांनी "स्पॉट बॉय'पासून "बॉलिवूड'च्या "शो मॅन'पर्यंतचा प्रवास केला. त्यांचा हा कौतुकास्पद प्रवास पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) पहिल्याच दिवशी ऋषी कपूर आणि रणधीर कपूर या "राज कपूर पुत्रां'कडून प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. शिवाय, राज कपूर यांच्या दुर्मिळ चित्रपटांच्या मूळ निगेटिव्हही ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करणार आहेत. 

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने 11 ते 18 जानेवारी दरम्यान "पिफ' होणार आहे. याच्या उद्‌घाटन सोहळ्यात ऋषी कपूर आणि रणधीर कपूर आपल्या वडिलांच्या 23 चित्रपटांच्या मूळ निगेटिव्ह संग्रहालयात देणार आहेत, असे महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे ही राज कपूर यांची कर्मभूमी आहे. इथेच त्यांच्या चित्रपटांचे जतन होणार, याला एक वेगळे महत्त्व आहे. यामुळे संग्रहालयाच्या खजिन्यातही भर पडेल, असेही डॉ. पटेल म्हणाले. 

सात मराठी चित्रपटांत स्पर्धा 
"पिफ'मधील मराठी चित्रपट स्पर्धा विभागातील चित्रपटांचीही घोषणा करण्यात आली. संयोजक समर नखाते म्हणाले, ""या स्पर्धेसाठी 47 चित्रपट दाखल झाले होते. त्यातील सात चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मुरांबा (वरुण नार्वेकर), पिंपळ (गजेंद्र अहिरे), झिपऱ्या (केदार वैद्य), नशीबवान (अमोल गोळे), फास्टर फेणे (आदित्य सरपोतदार), कच्चा लिंबू (प्रसाद ओक) आणि म्होरक्‍या (अमर देवकर) या चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.'' 

रात्रीही पाहता येणार चित्रपट 
""अनेक प्रेक्षकांना कार्यालयीन कामकाजामुळे सकाळ आणि दुपारच्या वेळेतील "पिफ'मधील चित्रपट पाहता येत नाहीत. म्हणून यंदापासून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सायंकाळी सात आणि रात्री नऊ या वेळात चित्रपट दाखवले जाणार आहेत. याआधी रात्रीच्या वेळी चित्रपट दाखवले जात नव्हते. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हा बदल करण्यात आला आहे,'' असे प्रकाश मगदूम यांनी सांगितले. 

"न्यूड'ची प्रेक्षकांना उत्सुकता 
"पिफ'च्या मराठी चित्रपटांच्या स्पर्धा विभागात सात चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात "इफी'मधून वगळल्या गेलेल्या "न्यूड' चित्रपटाचा समावेश नाही; पण या सात चित्रपटांशिवाय आणखी पाच मराठी चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. त्यात तरी "न्यूड'चा समावेश असणार का, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

Web Title: pune news Piff