लैंगिक शोषणप्रकरणी बोर्डिंग मालकाला शिक्षा

Crime
Crime

मुंबई - बोर्डिंगमधील मुलांशी संभोग आणि त्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने बोर्डिंग मालकाला शिक्षा केली. पुण्यातील या बोर्डिंग मालकाला 10 वर्षांचा कारावास उच्च न्यायालयाने ठोठावला.

बन्सीधर घुमरे (वय 28) याने पुणे सत्र न्यायालयात जून 2015मध्ये सुनावण्यात आलेल्या 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला आव्हान दिले होते. न्या. ए. एम. बदर यांच्यासमोर या अपिलावर सोमवारी सुनावणी झाली. पुण्यातील खेड तालुक्‍यातील बोर्डिंगमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी घुमरेला जानेवारी 2014 मध्ये अटक करण्यात आली होती. धार्मिक शिक्षण आणि संगीत वाद्य शिकण्यासाठी पालकांनी या मुलांना घुमरे यांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com