esakal | विनयभंग प्रकरणात सराईत गुन्हेगाराला शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

विनयभंग प्रकरणात सराईत गुन्हेगाराला शिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला विनयभंगाच्या एका गुन्ह्यांत किल्ला कोर्टाने शिक्षा सुनावली. राजकुमार नारायण तांडेल असे या ५६ वर्षीय आरोपीचे नाव असून तो कुलावा येथील मच्छीमारनगर क्रमांक दोनचा रहिवासी आहे. अलीकडेच त्याने एका महिलेचा विनयभंग केला होता.

या गुन्ह्यांत दहा दिवसांत तपास पूर्ण करून एल. टी मार्ग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आरोपपत्र सादर केले होते. या गुन्ह्यांत त्याला तीन वर्षांच्या सश्रम कारावासासह एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यांत सतरा दिवसांत आरोपीला शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा: आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द : राजेश टोपे

१८ सप्टेंबरला चर्नी रोड येथे आरेपीने महिलेची छेडछाड केली होती. एल. टी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत चौकशी केली असता तिने राजकुमार तांडेल या आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार केली होती. राजकुमार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात तीन तर आझाद मैदान पोलिस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद आहे.

loading image
go to top