Punjab Mail : पंजाब मेल झाली १११ वर्षाची! सुरुवातीला होती केवळ ६ डब्ब्यांची | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab Mail

Punjab Mail : पंजाब मेल झाली १११ वर्षांची! सुरुवातीला होती केवळ ६ डब्ब्यांची

मुंबई : पंजाब ते महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या पंजाब मेल या सर्वात जुन्या रेल्वेला १११वर्षे पूर्ण झाली. काळानुरूप या गाडीत विविध बदल झाले आहे. पंजाब मेल किंवा पंजाब लिमिटेड ट्रेन १ जून १९१२ रोजी ही मेल सुरू झाली.

प्रारंभी, भारतात प्रथमच पोस्टिंग झालेले सरकारी अधिकारी त्यांच्या पत्नीसमवेत मेलमधून आणले जात होते. साऊथॅम्प्टन आणि बॉम्बे दरम्यान स्टीमरचा प्रवास तेरा दिवस चालायचा. मुंबईच्या बल्लार्ड पियर मोल स्थानकापासून ते पेशावरकडे जीआयपी मार्गे, सुमारे ४७ तासांत २४९६ किमी अंतर कापत असे.

ट्रेनमध्ये सहा डब्यांचा समावेश होता. तीन प्रवाशांसाठी आणि तीन माल - टपालासाठी. प्रवासी डब्यांतील प्रवाशांची क्षमता फक्त ९६ होती. सर्व डब्बे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकणारे (कॉरिडॉर कार) होते आणि डबे प्रथम श्रेणीच्या, दोन बर्थ असलेल्या कंपार्टमेंटसह बनवले होते.

उच्च-श्रेणीतील प्रवाशांसाठी गाड्यांमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा होत्या.तसेच बाथरूम, एक रेस्टॉरंट कार, साहित्यासाठी डबा आणि एक डबा गोऱ्या साहेबांच्या नोकरांकरिता असे.स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाब लिमिटेड ही ब्रिटिश भारतातील सर्वात वेगवान ट्रेन होती. १९१४ पासून या रेल्वेचे बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) येथून प्रस्थान व आगमन होऊ लागले. त्यानंतर ही गाडी पंजाब लिमिटेड ऐवजी पंजाब मेल म्हणून ओळखली जाऊ लागली.

टॅग्स :Mumbai NewsPunjab