पंजाब मेलची धाव १०७ वर्षांची

पंजाब मेलचे संग्रहित छायाचित्र.
पंजाब मेलचे संग्रहित छायाचित्र.

मुंबई - देशातील सर्वांत जुन्या रेल्वे गाड्यांपैकी एक असलेल्या पंजाब मेलने शनिवारी तिच्या प्रवासाची १०७ वर्षे पूर्ण केली. मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या ‘दख्खनच्या राणी’ने (डेक्कन क्वीन) तिच्या प्रवासाची ८९ वर्षे आजच पूर्ण केली.

‘पंजाब लिमिटेड’ या नावाने एक जून १९१२ पासून पंजाब मेलने आपला प्रवास सुरू केला. तेव्हा ही गाडी मुंबईहून पेशावरपर्यंत जात असे. पेशावर आता पाकिस्तानात गेले आहे. प्रथम केवळ गोऱ्या प्रवाशांची (साहेब) मक्तेदारी असलेल्या या गाडीला नंतर खालच्या वर्गाचे डबे जोडले जाऊ लागले. १९३० च्या मध्यावर या गाडीला तृतीय वर्गाचे डबे जोडले गेले. १९४५ मध्ये पंजाब मेलला वातानुकूलित डबा (एअरकंडिशन्ड कार) लावला गेला. फाळणीपूर्वी ही गाडी मुंबईतील बॅलॉर्ड पिअर मोल या स्थानकावरून निघून पेशावरला जात असे.

२,४९६ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तेव्हा ४७ तासांचा कालावधी लागत असे. ब्रिटिश भारतातील ती सर्वांत वेगवान गाडी होती, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील रामदासी यांनी दिली. ब्रिटिशांच्या जमान्यात या गाडीत स्वच्छतागृह, भोजनगृह (रेस्टॉरंट कार) आणि नोकर व सामानासाठी वेगळा डबाही होता. फाळणीनंतर पंजाब मेलचा प्रवास पंजाबमधील फिरोझपूर कॅंटोन्मेंट स्थानकापर्यंत मर्यादित झाला. टपाल नेण्यासाठी या गाडीला तीन डबे जोडलेले असतात.

१,९३० किलोमीटर मुंबई-फिरोझपूर कॅंटोन्मेंटदरम्यानचे अंतर
३४ तास १५ मिनिटे प्रवासाला लागणारा वेळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com