राष्ट्रध्वज खरेदीसाठी लगबग सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नवी मुंबई : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्रदिनाच्या पार्श्‍वभूमीवर तिरंग्याची मागणी वाढली आहे. वाढत्या महागाईचा परिणाम म्हणून गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिरंगा आणि खादीचे कापड यांच्या मागणीबरोबरच भावातही मोठी वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वजांची विक्री होईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तर सिग्नल, रेल्वे स्टेशन, रिक्षा स्टॅण्ड, मॉल त्याचबरोबर दुकाने तिरंग्याच्या बाजारपेठांनी सजली आहे.

यापूर्वी केवळ शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये, काही निवड वर्गातील आस्थापना यांनाच राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी होती. मात्र मागील आठ वर्षांपासून कोणत्याही नागरिकास राष्ट्रध्वज लावण्याची परवानगी दिल्याने तिरंग्याच्या विक्रीत वाढ झाली आहे. तिरंग्याबरोबरच खादीचे कपडे, वूलनचे जॅकेट, खादीची टोपी यांचीही विक्री वाढली आहे. त्याचबरोबर दुचाकीवर लावण्यात येणाऱ्या झेंड्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली असून, ५० रुपयांना एक झेंडा विकण्यात येत आहे.

तरुणांमध्ये ट्रेंड बदलत चालला असून, टी-शर्टची फॅशनची बाजारात चलती आहे; तर लहान मुलांसाठी तिरंग्याची धोती, टी-शर्ट उपलब्ध आहे. मुलींसाठी तिरंग्याच्या कलरचा दुपट्टा बाजारात उपलब्ध आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे.
- हरिशभाई पांडेय, विक्रेते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the purchase of the national flag started