esakal | पुष्पक एक्स्प्रेस अत्याचार प्रकरणी आरोपींवर तत्काळ कारवाई करा- नीलम गोऱ्हे | Neelam Gorhe
sakal

बोलून बातमी शोधा

Neelam gorhe

पुष्पक एक्स्प्रेस अत्याचार प्रकरणी आरोपींवर तत्काळ कारवाई करा- नीलम गोऱ्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुष्पक एक्स्प्रेसमध्ये (Pushpak express) विवाहितेवर बलात्कार (rape case) आणि लूट प्रकरणी अटकेत असलेल्या आठ दरोडेखोरांवर (thief) तत्काळ आवश्यक कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip walse-patil) यांच्याकडे एका पत्राद्वारे (letter) केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत (commuters safety) सातत्याने बैठका घेऊन अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासन आणि गृह विभागाला (home ministry) करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: डहाणूत मालगाडीचा डबा घसरला

पुष्पक एक्स्प्रेसमधील घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी अतिरिक्त काळजी घेण्याबाबत उपाय करावेत, रेल्वेडब्यांमध्ये पोलिसांची संख्या वाढवावी, घटनेच्या वेळी डब्यामध्ये असलेल्या पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई का केली नाही याची चौकशी करावी, पीडितेचे समुपदेशन करावे, संरक्षण मनोधैर्य योजनेतून तपास योग्य प्रकारे करण्यासंदर्भात स्पष्ट सूचना द्याव्यात आणि रात्रीच्या वेळी प्रत्येक डब्यात शस्त्रासह आवश्यक सुरक्षा ठेवावी, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल आणि अप्पर पोलिस महासंचालक (लोहमार्ग) प्रज्ञा सरवदे यांनाही पत्र पाठवण्यात आले आहे.

उपाययोजना रखडल्या

रेल्वे आणि महाराष्ट्र पोलिसांची एकत्रित बैठक ऑक्टोबर २०२० व जुलै २०२१ रोजी घेण्यात आली होती. रेल्वे महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांबाबतचे निवेदन रेल्वेमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांही पाठवण्यात आले आहे. त्यांपैकी काही उपाययोजना विविध कारणांनी रखडल्या आहेत. गुन्हे घडणाऱ्या ठिकाणी गस्त वाढवणे, सीसी टीव्ही कॅमेरे लावणे, महिलांच्या डब्यात अतिरिक्त गस्त, टोल फ्री क्रमांकावरील कॉलला तत्काळ उत्तर देऊन आवश्यक कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

loading image
go to top