संजय गांधी नॅशनल पार्कमधील रस्त्यांवर कुंपण घाला 

borivali
borivali

मुंबई : बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी रस्त्यावर येत असल्याने अनेक अडचणी येतात होते. त्यामुळे उद्यानातील रस्त्यांवर कुंपणच घाला, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मंगळवारी उद्यानात झालेल्या "आरंभ' या कार्यक्रमात केली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला. 
उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी उद्यानातील करमणूक क्षेत्र पुन्हा सुरू करण्याची मागणीही शेट्टी यांनी या वेळी केली. या कार्यक्रमात अभिनेत्री रवीना टंडन यांची उद्यानाची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून घोषणा करण्यात आली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, आमदार प्रवीण दरेकर, सरदार तारा सिंग, मनिषा चौधरी, प्रकाश सुर्वे, वनविभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्‍चिम) एम के राव, उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अन्वर अहमद आदी उपस्थित होते. 

उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्ता चांगला आहे. मात्र पुढे रस्त्यांचा दर्जा सुमार आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार चौधरी यांनी केली. आमदार सरदार तारा सिंग यांनी भाषणात रविना टंडनचा उल्लेख सुधा टंडन असा केल्याने कार्यक्रमात हशा पिकला. 

राष्ट्रीय उद्यानात प्राणी फिरणार नाहीत तर कोण फिरणार? जंगलातील रस्त्यांवर कुंपण घालण्याची गरज असते का. असा सल्ला देत खासदारांनी ज्ञान पाजळले आहे. 
- देबी गोएंका, पर्यावरणतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com