राज ठाकरेंना बेड्या ठोका, तुरुंगात टाका; अबु आझमींची पवारांकडे मागणी

abu azmi
abu azmi

मुंबई: समाजावादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरील वक्तव्यावर टीका केली आहे. त्यांनी राज ठाकरेंवरील कारवाईच्या मागणीसाठी शरद पवारांसाठी भेट घेतली आहे. त्यांनी राज ठाकरेवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. राज ठाकरे यांना अटक करून तुरुंगात टाकावे अशी मी शरद पवार यांच्याकडे मागणी केली असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राज ठाकरेंना बेड्या ठोकून तुरुंगात टाका, अशी मागणी त्यांनी केली आहे.

abu azmi
नाना पटोलेंनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, भेटीची कारणे दोन...

काय म्हणाले अबु आझमी?

अबु आझमी म्हणाले की, हे सरकार चालवण्याची महत्वाची भूमिका शरद पवार बजावत आहेत. काही असे लोक आहेत ज्यांची औकात नाही आणि ते मुस्लिम धर्माला त्रास देत आहेत. सानपाडा येथे शिवसेनेचे लोक मशीद बांधण्यामध्ये आक्षेप घेत आहेत. या मुस्लिम बांधवाना सुरक्षा दिली पाहिजे, या राज्यात सेक्युलर सरकार आहे तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते असा प्रकार करत आहेत, असं त्यांनी म्हटलंय.

abu azmi
सुशांतसिंग प्रकरणाची RTI व्दारे माहिती मागितल्यावर CBI चे धक्कादायक उत्तर

'राज ठाकरेंना बेड्या ठोका'

पुढे राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंगे हटवा या वक्तव्याबाबत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलंय की, राज ठाकरे सारख्या नेत्याची काही औकात नाहीये. ज्यांचे आमदार नाहीयेत, ते मनाला वाटेल ते बोलतात, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले की, राज ठाकरे यांना अटक करून तुरुंगात टाकावे अशी मी शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे.

लाऊडस्पीकरला राज्यात परवानगी आहे. मशीदमध्ये फक्त 2 मिनिट अजाण होते, असंही ते म्हणाले. राज ठाकरेंनी जी सभा घेतली त्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज ठाकरेंना बेड्या ठोकून तुरुंगात टाका, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com