क्वारंटाईनसाठी आशिष शेलारांनी सुचवला 'हा' पर्याय, मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

ashish shelar
ashish shelar

मुंबई- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटरची पुरेशी जागा उपलब्ध होत नाही आहे. यावरच भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सरकारला एक पर्याय सुचवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यांनी याबाबतची मागणी देखील केली आहे. ईडीने जप्त केलेल्या इमारती क्वारंटाईनसाठी घ्या, असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे. 

त्या इमारतींना क्वारंटाईन सेंटर बनवा 

या पत्रात आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना नॅशनल हेराल्डसह ईडीने जप्त केलेल्या इतर इमारती क्वारंटाईन सेंटरसाठी वापरा, अशी मागणी केली आहे. याबाबत आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली.  वांद्रे पूर्व येथील नॅशनल हेरॉल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या सुमारे 2 लाख चौ.फु.क्षेत्रफळाच्या ईडीने जप्त केलेल्या इमारतीसह मुंबईत ईडीने जप्त केलेल्या इमारती कोरोना रुग्णांना क्वारंटाईन सेंटरसाठी महाराष्ट्र शासनाने ताब्यात घ्याव्यात, असं पत्रात म्हटलं आहे. 

आशिष शेलारांनी पत्रात काय म्हटलं?

कलानगर जवळील वांद्रे पूर्व भाग, गांधी नगर, एमआयजी क्लब आसपासचा परिसर, वांद्रे पूर्व स्टेशन परिसरात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. तसंच एच-ईस्ट प्रभागात आजपर्यंत 300 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यातल्या बरेचसे जण झोपडपट्टीत किंवा चाळींमध्ये राहतात. त्याच ठिकाणी त्यांना घरात वेगळं ठेवणं शक्य नाही. त्यामुळे या परिसरात रहिवाशांना निवासस्थानाजवळ विलगीकरण कक्ष उपलब्ध करुन देणे आव्हात्मक काम आहे. ईडीनं नॅशनल हेरॉल्ड प्रायव्हेट लिमिटेडची इमारत ताब्यात घेतली आहे. या इमारतीचं सुमारे 2 लाख चौरस फूटपेक्षा जास्त चटईक्षेत्र आहे. या इमारतीचं जवळपास संपूर्ण बांधकाम पूर्ण झालं आहे. कोरोना व्हायरस हॉटस्पॉट आणि वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गाजवळ ही इमारत आहे. त्यामुळे या इमारतीत जवळपास 1 हजार खाटांची सुविधा करणं शक्य असल्याचंही शेलारांनी पत्रात नमूद केलं आहे. 

सध्या मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा पाहता तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आताच परदेशातील आणि परराज्यातल्या नागरिकांना येण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. तसंच पावसाळाही जवळ आला आहे. यामुळे सर्व पार्श्वभूमीवर विलगीकर कक्षासाठी जास्तीत जास्त जागा सरकार उपलब्ध करुन देताहेत. दुसरीकडे राज्य सरकारनं विलगीकरण सेंटरसाठी काही जागांची मागणीही केल्याचं तुम्ही जाहीर केलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला जागेची कमतरता पाहता सरकारनं ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करावं. अशा जप्त केलेल्या वास्तूंची मागणी कोरोना व्हायरस रुग्णांसाठी स्वतंत्र आणि बेड सुविधा उपलब्ध करण्यासाठी करावी, अशी मागणी आशिष शेलारांनी आपल्या पत्रात केली आहे. 

'या' नव्या ठिकाणी आयशोलेशन बेड्स तयार

मुंबई महापालिका नवीन आयसोलेशन बेड्स तयार करत आहेत. त्यापैकी 300 बेड्स महालक्ष्मी रेसकोर्समध्ये तर 100 बेड्स नेहरु सायन्स सेंटरमध्ये तयार करण्यात येताहेत. त्यासोबतच 200 बेड्स नेहरु प्लॅनेटेरियम, 500 बेड्स बीकेसीच्या MMRDA च्या मैदानावर, 200 बेड्स रिचर्डसन क्रूडास आणि NSCI च्या येथे आयसीयूची नवी सुविधा करण्यात आली आहे. 

महालक्ष्मी रेसकोर्समध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगचा भाग मोकळा आहे. त्यामुळे  रेसकोर्सच्या पार्किंगमध्ये पालिकेनं 200 बेड्स आयसोलेशनची सुविधा केली आहे. रेसकोर्सपासून हाकेच्या अंतरावर असलेलं नेहरु सायन्स सेंटर आणि नेहरु प्लॅनेटेरियम येथे 200 आणि 100 बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. जे. जे. हॉस्पिटलजवळील रिचर्डसन क्रुडास कारखान्यात 200 आयसोलेशन बेड्स जोडल्या आहेत. माहिम येथे नेचर पार्क येथे 600 बेड्सची सुविधा केली असून MMRDA मैदानावर लवकरच 500 बेड्सचा वेगळा वॉर्ड असणार आहे.

For quarantine, Ashish Shelar suggested some option, a letter was sent to the Chief Minister

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com