आता 'या' मैदानात क्वारंटाईन किंवा विलगीकरण केंद्र उभारण्याचा मुंबई महापालिकेचा विचार ?

bkc
bkc

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानातही आवश्‍यकता भासल्यास क्वारंटाईन किंवा विलगीकरण केंद्र उभारण्याचा विचार मुंबई महापालिका करत आहे. क्वारंटाईनची संख्या वाढवण्यासाठी शैक्षणिक इमारतीपाठोपाठ मैदानांचा पर्यायही पुढे येऊ लागला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिकेने आता मोकळ्या जागांचा शोध सुरू केला आहे. 

महिनाभरात कोरोनाची बाधा 70 हजार जणांना होईल असे अपेक्षित धरून मुंबई महापालिका आता नियोजन करत आहे. त्यासाठी क्वारंटाईनची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. गोरेगाव येथील राष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात क्वारंटाईन केंद्र बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर बीकेसी येथील मैदानाही क्वारंटाईन केंद्र बनवण्याचा विचार महापालिका करत आहे. पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी रविवारी या मैदानांची पाहणी केली आहे.  या मैदानात क्वारंटाईन किंवा आयसोलेशन केंद्र बनवण्याचा विचार पालिक करत आहे. मुंबईत आढळलेल्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. अशा रुग्णांना 14 दिवस अलगीकरण केंद्रात ठेवण्यात येईल. तसेच संशयित रुग्णांच्या चाचणीचे अहवाल येणापूर्वीही त्यांना अलगीकरण केंद्रात ठेवता येईल. 

सध्या महापालिकेने 12 हजार जणांना क्वारंटाईन करता येईल अशी यंत्रणा उभारली आहे. गेल्या आठवड्यात ही क्षमता 40 हजारपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या इमारती ताब्यात घेण्यात येत आहेत; मात्र शनिवारी आयुक्त परदेशी यांनी घेतलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत येत्या महिनाभरात 70 हजार रुग्णांवर उपचार करता येतील अशी तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता क्वारंटाईन केंद्रांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता मैदानेही वापरली जाण्याची शक्‍यता आहे.

 Quarantine center in the grounds too? Inspection of BKC ground by Municipal Commissioner

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com