पोलिसांनी चक्क धडधाकट व्यक्तीला केलं क्वारंटाईन?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

कोरोनाबाधित नसतानाही कामगार संघटनेच्या सदस्याला पोलिसांनी क्वांरटाईन केले आहे. त्यांना हजर करण्याचे निर्देेश द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मुंबई : कोरोनाबाधित नसतानाही कामगार संघटनेच्या सदस्याला पोलिसांनी क्वांरटाईन केले आहे. त्यांना हजर करण्याचे निर्देेश द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  न्यायालयाने याचिकेची दखल घेत मुंबई पोलिसांना लेखी खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन संघटनेचे सदस्य के. नारायणन यांना अकारण पोलिसांनी क्वारंटाईन केले आहे, असा आरोप नारायणन यांचे निकटवर्तीय व याचिकाकर्ते महेंद्र सिंह यांनी केला आहे. 

हे नक्की वाचा पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय

काही दिवसांपूर्वी अंधेरीमध्ये नारायणन आणि अन्य दोन व्यक्ती जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. काही वेळाने नारायणन यांच्या अन्य सहकाऱ्यांची पोलिसांनी सुटका केली व नारायणन यांना कोविड चाचणीसाठी गोरेगाव येथे  खासगी लॅबमध्ये नेले. चाचणीचा अहवाल दोन दिवसात कळेल असे सांगण्यात आले. ते परत आपल्या घरी जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना थांबवले व क्वारंटाईनसाठी घेऊन गेले. तसेच, त्यांचा मोबाईलही जप्त केला, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या आरोपांबाबत खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून नारायणन यांच्या चाचणीचा अहवाल दाखल करण्यासही पोलिसांना सांगितले आहे.

नक्की वाचा : म्हणून 'त्या' पाच मुली देणार कोरोनाची अग्निपरीक्षा, जाणून घ्या अधिक...

याचिकेवर पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. नारायणन यांना कपडे आणि फोन देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. क्वारंटाईन भागात आधीच  सुविधा कमी आहेत. त्यात धडधाकट व्यक्तीला गैरप्रकारे का डांबून ठेवले आहे, असा सवाल याचिकादारांकडून करण्यात आला आहे.

 

Quarantine despite being tough? Petition in the High Court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine despite being tough? Petition in the High Court