"एकही महत्त्वाचं खातं नसलेले पाहिले मुख्यमंत्री सध्या शॅडो म्हणूनच काम करतायत"

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 11 March 2020

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसेच्या वर्धापनदिनी शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक खात्यांवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. दरम्यान मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर आजच्या शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसेच्या वर्धापनदिनी शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक खात्यांवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. दरम्यान मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर आजच्या शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील आणि देशातील विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो’ कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये, असा घणाघाती टोला सामनाच्या अग्रलेखातून मनसेला लागवण्यात आला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील जशास तसं उत्तर दिलंय. 'हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय, पिक्चर तो अभी बाकी है', या शब्दांमध्ये मनसे नेते अमेय खोपकर यांनी शिवसेनेला प्रत्यूत्तर दिलंय. 

महत्त्वाची बातमी - जरासं दुर्लक्ष आणि चार वर्षांचा आरिफ आई वडिलांना सोडून गेला...

काय म्हणालेत अमेय खोकर ? 

केवळ अमेय खोपकरच नव्हे तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील सामानातील अग्रलेखाला सडेतोड उत्तर दिलंय. आपल्या उत्तरातून संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीये. "मुख्यमंत्री पद अजित दादाच खऱ्या अर्थाने सांभाळत असल्यामुळे खरे मुख्यमंत्री दहा ते पाचच काम करतात. एकही महत्वाच खातं नसलेले महाराष्ट्रातले पाहिले मुख्यमंत्री सध्या शॅडो म्हणूनच काम करतायत. त्यामुळे शॅडो मुख्यमंत्रीपद देऊन वेळ चा अपव्यय कशासाठी असा विचार राजसाहेबांनी केला असावा", अशी टीका संदीप देशपांडे यांनी केलीये. 

महत्त्वाची बातमी - 'ते' ही लहान, 'तो' नऊ वर्षांचा; त्यांनी पॉर्न पाहून त्याला नेलं जवळच्या झुडपात...

काय म्हणालेत संदीप देशपांडे ? 

quarrels between MNS and Shivsena over shadow cabinet and samana editorial


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quarrels between MNS and Shivsena over shadow cabinet and samana editorial