कंपन्यांची सुरक्षा रामभरोसे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नवी मुंबई - खैरणे एमआयडीसीतील सहा कंपन्या बुधवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यामुळे ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. येथील बहुतेक कंपन्या १९७०-७५ मधील आहेत. त्यामुळे त्यांची अग्निशमन यंत्रणा कितपत सक्षम आहे, याबाबत शंका आहे. एमआयडीसीच्या अग्निशमन दलामध्ये अवघे ६० ते ७० कर्मचारी असून सुमारे तीन हजार कंपन्यांची भिस्त त्यांच्यावर आहे. यामुळे एमआयडीसीची सुरक्षा रामभरोसे आहे.  

बुधवारी पहाटे खैरणे एमआयडीसीतील अलमा या केमिकल कंपनीसह सहा कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. नाईक इन्व्हयर्न्मेंटल कंपनीतून आग पुढच्या कंपनीत पसरली असती तर मोठा अनर्थ झाला असता, अशी भीती अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सात ते आठ तास अथक प्रयत्न करून या कंपन्यांना लागलेली आग आटोक्‍यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत तीन कामगार होरपळले. बुधवारी ज्या कंपन्यांमध्ये आगीची घटना घडली, तेथे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होती का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.  

एमआयडीसीच्या अग्निशमन दलामध्ये ६० ते ७० कर्मचारी असून एमआयडीसीतील सुमारे तीन हजार कंपन्यांची भिस्त त्यांच्यावर आहे. त्यामुळे आगीची दुर्घटना घडल्यास ती आटोक्‍यात आणणे अडचणी ठरते.

चार महिन्यांत 30 घटना
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये एमआयडीसीत आगीच्या ३० घटनांची नोंद झाली आहे. २०१७ मध्ये ११२ आगीच्या घटना घडल्या. यात चार मोठ्या आगीच्या घटनांची नोंद आहे. गेल्या डिसेंबरमध्ये महापे एमआयडीसीतील स्टॉक होल्डिंग कंपनीच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या आगीचाही यात समावेश आहे. येथील आग १४ दिवस धुमसत होती. २०१६ मध्ये ५४ आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. या आकडेवारीवरून आगीच्या घटनांत दुपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट होते. एमआयडीसीत सुमारे तीन हजार कंपन्या असून त्यात रासायनिक कंपन्यांचाही समावेश आहे.

Web Title: question of security of companies in industrial estates