esakal | पनवेल : सीएनजी पंप बंद पडल्याने वाहनांच्या रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पनवेल : सीएनजी पंप बंद पडल्याने वाहनांच्या रांगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : महानगर गॅसकडून (GAS) कमी दाबाने सीएनजीचा (CNG) पुरवठा होत असल्याने काही वेळा करिता पंप बंद ठेवण्यात आल्याचा मोठा फटका गणेशोत्‍सवासाठी कोकणात (Kokan) निघालेल्या सीएनजी (CNG) वाहनचालकांना बसला. पंपावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र बुधवारी पनवेल (Panvel) परिसरातील सीएनजी पंपावर पाहायला मिळाले. दरवर्षी गणपती निमित्त मुंबई (Mumbai) , ठाण्यातून (Thane) कोकणात (Kokan) जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या कालावधीत कोकणात जाणाऱ्या एसटी बसचे (ST BUS) रिझर्वेशन फूल होत असल्याने अनेकजण खासगी अथवा भाड्याने घेतलेल्या चारचाकी वाहनाने गावी जाण्यास पसंती देतात.

सध्या इंधनाचे दर वाढल्याने अनेकांनी सीएनजीवर चालणारी वाहन खरेदीला पसंती दिली असल्याने सीएनजी वाहनांची संख्या वाढली असून, मुंबई, ठाण्यातून सीएनजी गॅस भरून कोकणात जाताना शेवटचा थांबा म्हणून मुंबई - गोवा महामार्गावरील पळस्पा तसेच पनवेल परिसरातील सीएनजी पंपावर सीएनजी भरण्याला अनेक जन प्राधान्य देत असतात. बुधवारी कोकणात जाताना पनवेल परिसरातील सीएनजी पंपावर गॅस भरून पुढील प्रवास पूर्ण करण्याचे नियोजन अनेक वाहनचालकांनी आखले होते. मात्र ऐनवेळी पंपाना ऑनलाईन गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस कंपनीकडून कमी दाबाने गॅस पुरवठा केला जात असल्याने अपेक्षित दाब निर्माण करण्यासाठी काही वेळ पंपाद्वारे वाहनांना गॅस पुरवठा बंद करण्यात आला होता. लांबच लांब रांगामध्ये उभे राहावे लागल्‍याने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

हेही वाचा: दुर्दैवी; बाळाला जीवदान दिले पण आई कायमची निघून गेली

मुंबईहून निघून पनवेल परिसरातील सीएनजी पंपावर गॅस भरून विनाथांबा पुढील प्रवास करून वेळेत गावी पोहचण्याचा विचार होता. मात्र पंपावर लागलेल्या लाईन मध्येच दीड दोन तास गेल्याने गावी पोचण्यासाठी देखील विलंब लागणार आहे.

- रणजीत गवाळे, कोकणात जाणारे भाविक

loading image
go to top