न्यायालय अवमानप्रकरणी राबिया खान यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - सूरज पांचोली आणि त्याच्या कुटुंबीयावर कोणतेही बदनामीकारक वक्तव्य करणार नाही, असे आश्‍वासन अभिनेत्री जिया खानची आई राबिया खान यांनी उच्च न्यायालयात दिले होते. त्यानंतरही अभिनेता सूरज पांचोली आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सोशल मीडियावर बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे राबिया खान यांच्याविरोधात न्यायालयाच्या अवमानप्रकरणी नोटीस पाठविण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे न्या. गौतम पटेल यांनी हे आदेश दिले.

पांचोली कुटुंबीयांनी राबिया खानविरुद्ध अवमान याचिका दाखल केली होती. सोशल मीडियात बदनामी केल्याबाबत 100 कोटी रुपयांचा दावाही पांचोली कुटुंबीयांनी केला आहे. उच्च न्यायालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने राबिया खान यांना सूरज पांचोली व पांचोली कुटुंबीयांविरुद्ध प्रसारमाध्यमे, सोशल मीडियावर बदनामीकारक वक्तव्ये न करण्याचे निर्देश 3 फेब्रुवारीला दिले होते. राबिया यांनी उच्च न्यायालयाला तसे आश्‍वासन दिले होते. तरीही त्यांनी ट्‌विटरवर बदनामीकारक मजकुर टाकून सूरज व पांचोली कुटुंबाची बदनामी करत असल्याचे आदित्य पांचोली व झरीना वहाब यांचे म्हणणे होते.

Web Title: Rabia Khan, a notice in case of contempt of court