रेसकोर्स, विलिंग्टनची लगाम मुख्यमंत्र्यांच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई - सरकारी भूखंडावरील रेसकोर्स, विलिंग्टन गोल्फ क्‍लब; तसेच अन्य क्‍लबची लगाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हाती घेतली आहे.

मुंबई - सरकारी भूखंडावरील रेसकोर्स, विलिंग्टन गोल्फ क्‍लब; तसेच अन्य क्‍लबची लगाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हाती घेतली आहे.

या सर्व क्‍लबच्या भूखंडांच्या भाडेकराराचे नवे धोरण राज्य सरकारच ठरवणार आहे, तर इतर निवासी आणि व्यावसायिक संस्थांना दिलेल्या भूखंडाच्या भाडेकराराच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव सुधार समितीपुढे मांडण्यात आला आहे. हा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला खिजवण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यावर निर्णय झालेला नसताना मुख्यमंत्र्यांनी रेसकोर्स, ताडदेव येथील विलिंग्टन क्‍लब; तसेच इतर क्‍लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेकराराचे नूतनीकरण करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती पालिका प्रशासनाने सुधार समितीत सादर केली आहे. राज्य सरकारचे पालिकेने भाडेकराराने दिलेल्या इतर भूखंडाच्या भाडेकराराच्या नूतनीकरणासाठी धोरण ठरविण्यात आले आहे. हे धोरण मंगळवारच्या सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आले आहे. त्यात बेकायदा बांधकामप्रकरणी दंड वसूल करूनच भाडेकराराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या धोरणामुळे 242 मालमत्तांच्या भाडेकराराचे नूतनीकरण करता येणार असून, त्यातून पालिकेला महसूल मिळणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Web Title: racecourse wilington control in chief minister hand