बोगस कागदापत्रांद्वारे जामीन मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; 6 जणांना अटक

दिनेश गोगी
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

उल्हासनगर : बोगस करपावत्या, राशनकार्ड, आधारकार्ड, स्टॅम्प असे कागदपत्रे न्यायालयात सादर करून तब्बल 125 ते 150 आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या 6 जणांच्या टोळीचा उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे.

उल्हासनगर : बोगस करपावत्या, राशनकार्ड, आधारकार्ड, स्टॅम्प असे कागदपत्रे न्यायालयात सादर करून तब्बल 125 ते 150 आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या 6 जणांच्या टोळीचा उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे.

त्यांना अटक करताना त्यांच्याकडून 400 च्यावर बोगस डॉक्युमेंट जप्त करण्यात आले आहेत. उल्हासनगर न्यायालयात आरोपींना बोगस कागदापत्रांद्वारे जामीन मिळवून देणारी टोळी येणार असल्याची खबर गुन्हे अन्वेषण पोलिसांना मिळताच, सहाय्यक पोलिस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे, पोलिस निरीक्षक मनोहर पाटील, साहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, युवराज सालगुडे, उपनिरीक्षक गणेश तोरगल यांच्यासोबत उदय पालांडे, सुरेंद्र पवार, भरत नवले, संजय माळी आदींनी न्यायालयाच्या आवारात सापळा रचून आरोपींच्या जामिनासाठी बोगस कागदपत्रांसह 6 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 45 रबरी स्टॅम्प, 51 राशनकार्ड, 318 ग्रामपंचायतच्या करपावत्या, आधारकार्ड असे बोगस कागदपत्रे जप्त करण्यात आले.

आरोपींनी बोगस रेशनकार्डसाठी भिवंडी येथील झेरॉक्स सेंटरची व बोगस करपावत्यासाठी उल्हासनगर मधील एका प्रिंटिंग प्रेसची मदत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुसक्या आवळण्यात आलेल्या आरोपींची नावे मुद्दाम गुलदस्त्यात गुप्त ठेवण्यात आले आहे. हे मोठे रॅकेट असून त्याचा पर्दाफाश करण्याचा त्यामागील हेतू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

Web Title: racket busted 6 people arrested