पनवेलमध्ये हळदीच्या कार्यक्रमात राडा ; नवरदेवाच्या मित्रावर दारूच्या बाटलीने हल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

भूषण कोळी (22) असे जखमीचे नाव आहे. सीबीडीतील दिवाळे गावात तो राहण्यास आहे. 6 मे रोजी खालचा ओवळा गावातील भूषणचा मित्र अतुल गायकवाड याच्या हळदीचा कार्यक्रम असल्याने भूषण रात्री 12 वाजता खालचा ओवळा गावात गेला होता.

नवी मुंबई : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून झालेल्या वादातून नवरदेवाच्या चुलत्याने नवरदेवाच्या मित्रावर दारूच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना घडली. यात नवरदेवाच्या मित्राचे नाक फ्रॅक्‍चर झाले आहे. ही घटना पनवेलच्या खालचा ओवळा गावात घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी नवरदेवाच्या चुलत्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. 

भूषण कोळी (22) असे जखमीचे नाव आहे. सीबीडीतील दिवाळे गावात तो राहण्यास आहे. 6 मे रोजी खालचा ओवळा गावातील भूषणचा मित्र अतुल गायकवाड याच्या हळदीचा कार्यक्रम असल्याने भूषण रात्री 12 वाजता खालचा ओवळा गावात गेला होता. या हळदीच्या कार्यक्रमात भूषणसह त्याचे सगळे मित्र पहाटे 2 वाजेपर्यंत नाचत होते. त्यामुळे ते थकल्याने बाजूला बसले होते; मात्र याचवेळी नवरदेव अतुल गायकवाडचा चुलता सुखदेव गायकवाड हा दारूच्या नशेत भूषण आणि त्याच्या मित्रांना नाचण्यास जबरदस्ती केली; मात्र त्यांनी थकल्यामुळे नाचण्यास नकार दिला.

सगळ्यांनी नाचण्यास नकार दिल्यानंतर सुखदेव गायकवाड यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे भूषणने त्यांना शिवीगाळ न करण्याची समज दिल्याने सुखदेव यांनी रागाच्या भरात त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर हातातील बाटली त्याच्या नाकावर जोराने मारल्याने तो जखमी झाला. 

Web Title: Rada in Panvel program Grooms friend attacked the alcohol bottle