"रईस' चित्रपट होणार पाकिस्तानातही प्रदर्शित 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई : पाकिस्तानात भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यावरील बंदी उठवल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. आता पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि शाहरूख खान यांची मुख्य भूमिका असलेला "रईस' चित्रपट पाकिस्तानमध्ये बुधवारी (ता. 25) प्रदर्शित होणार आहे. पाकच्या सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला यू. ए. सर्टिफिकेट दिले आहे. सात ठिकाणी कात्री लावल्यानंतर हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होत आहे. 

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची भूमिका असल्यामुळे "रईस' हा चित्रपट वादात सापडला होता; पण शाहरूख खानने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन चित्रपटाच्या प्रदर्शनात कोणतीही अडचण येऊ नये, अशी विनंती केली. त्यानंतर मनसेने हिरवा कंदील दाखवला. आता हा चित्रपट पाकिस्तानातही बुधवारीच प्रदर्शित होत आहे. 
"रईस'च्या प्रसिद्धीसाठी सोमवारी शाहरूख खानने मुंबई ते दिल्ली हा प्रवास रेल्वेने केला. सायंकाळी मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकातून त्याने ऑगस्ट क्रांती राजधानी एक्‍स्प्रेसने प्रवास सुरू केला. 

Web Title: Raees to release in Pakistan!