संघ बदनामीप्रकरणी राहुल गांधींना जामीन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) बदनामीप्रकरणी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज (बुधवार) भिवंडी न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 जानेवारीला होणार आहे.

भिवंडी न्यायालयात हजर राहण्यासाठी मंगळवारी रात्रीच राहुल गांधी मुंबईत दाखल झाले होते.आज सकाळी भिवंडी न्यायालयात हजर राहण्यासाठी ते काँग्रेस नेत्यांसह भिवंडी न्यायालयात उपस्थित राहिले. न्यायालयाने त्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबद्दलची सुनावणी भिवंडी न्यायालयात सुरू आहे. मुंबईत असल्याने कॉंग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेऊन देशातील विविध राजकीय प्रश्नांवर चर्चा केली. 

Web Title: Rahul Gandhi to appear in Bhiwandi court