मोदी, संघाविरोधात विरोधक एकवटले : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

भाजप आणि संघाविरोधात तयार होत आहे. महाआघाडीला जोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. भाजप, संघ देशातील संघटनांवर आक्रमण करत आहे. कच्च्या तेलाचे दर कमी असताना दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून मोजक्या श्रीमंत व्यक्तींच्या खिशात पैसे जात आहेत.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. यांच्याकडून देशातील सर्व संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकांच्या भावना विरोधक मांडत आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच ते भिवंडी न्यायालयातही उपस्थित होते. आज (बुधवाऱ) ते नागपूरला रवाना होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार व संघावर जोरदार टीका केली. कृषि संशोधक आणि एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी यवतमाळ जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथे जाणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत.

राहुल गांधी म्हणाले, की महाआघाडी पंतप्रधान, भाजप आणि संघाविरोधात तयार होत आहे. महाआघाडीला जोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. भाजप, संघ देशातील संघटनांवर आक्रमण करत आहे. कच्च्या तेलाचे दर कमी असताना दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून मोजक्या श्रीमंत व्यक्तींच्या खिशात पैसे जात आहेत. पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा अशी आमची मागणी आहे. पण पंतप्रधानांना यात काही रस नाही. गब्बरसिंह टॅक्समुळे, नोटाबंदीमुळे छोटे व्यापारी अडचणीत आले आहे. मुंबईच्या नागरिकांचे विशेष आभार, त्यांच्याकडून खूप प्रेम मिळते. 

Web Title: Rahul Gandhi criticize Narendra Modi and RSS in Mumbai