राहुल गांधी यांच्यावर आरोप निश्चित

ऊर्मिला देठे
मंगळवार, 12 जून 2018

भिवंडी : महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भिवंडी न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. सुनावणीला आज ते स्वतः हजर राहिले. आरोप अमान्य केल्यामुळे राहुल गांधी यांच्यावर भादंवि 499 व 500 अंतर्गत मानहानी प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले. 

आरएसएसचे स्थानिक कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी या विरोधात तक्रार केली होती. 6 मार्च 2014 रोजी भिवंडीतील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी गांधी हत्येबाबत धक्कादायक आणि आरएसएसविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचे कुंपणे यांनी तक्रारीत नमूद  केले होते.

2 मे च्या सुनावणीत न्या. ए. आय. शेख यांनी 12 जूनला आरोप निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगत राहुल गांधी यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. न्यायालयात जबाब नोंदवत असताना दोषी नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. 

वरिष्ठ काॅग्रेस नेते अशोक गेहलोत आणि अशोक चव्हाण न्यायालयात उपस्थित होते. यावेळी न्यायालय परिसरात  कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

न्यायालयाच्या सुनावणीनंतर संध्याकाळी चार वाजता गोरेगाव येथे राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून पक्षाच्या नगरसेवकांशीही संवाद साधणारा आहेत. याच कार्यक्रमात  'शक्ती' नामक योजनेची सुरूवातही केली जाण्याची शक्यता आहे.

'शक्ती'द्वारे स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट संवाद साधला जाणार असून विविध मुद्यांवर इथे व्यक्त केलेली मते विचारात घेतली जाणार आहेत.

Web Title: Rahul Gandhi pleads not guilty in Bhiwandi Court