भाजप नेत्याच्या नातेवाईकांच्या हॉटलांवर छापा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

उल्हासनगर : सत्तेत असलेले भाजपाचे सभागृह नेते जमनादास पुरस्वानी यांच्या नातेवाईकांच्या दोन हॉटलांवर उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागाने छापेमारी करून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. यात 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला  आहे. विशेष प्लॅस्टिक बंदीसाठी केंद्रातील भाजपाने कंबर कसली असताना भाजपाच्याच नेत्याच्या नातलगांनी प्लॅस्टिक बंदीचे धिंडवडे काढल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. 

जमनादास पुरस्वानी हे सभागृह नेते असल्याने स्वच्छभारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण तसेच प्लॅस्टिक बंदीचे आवाहन केलेल्या पोस्टर्सवर महापौर पंचम कलानी, आयुक्त अच्युत हांगे, उपमहापौर जीवन इदनानी, आरोग्य सभापती इंदिरा उदासी यांच्यासोबत जमनादास पुरस्वानी यांचे देखील फोटो झळकलेले आहेत.असे असताना स्वतःच्या घरापासून किंबहूना व्यवसाया पासून प्लॅस्टिक बंदीसाठी सुरवात करण्याऐवजी पुरस्वानी यांच्या नातेवाईकांच्याच हॉटेलमध्येच प्लॅस्टिकचा मोठा साठा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुरस्वानी यांच्या नातेवाईकांच्या नावावर उल्हासनगरात अनेक ठिकाणी जय वैष्णू देवी ह्या शुद्ध शाकाहारी हॉटेल्स आहेत. इतर व्यापारी व सर्व हॉटेलात प्लॅस्टिक पिशव्यांची बंदी असताना पुरस्वानी यांच्या नातलगांच्या वैष्णू देवी या हॉटेलात जेवण पार्सलसाठी प्लॅस्टिक पिशव्या सऱ्हासपने पिशव्यांचा वापर करण्यात येत असल्याची बाब मासमीडियावर चव्हाट्यावर आल्यावर त्याची गंभीर दखल आयुक्त अच्युत हांगे यांनी घेतली. मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार यांना आदेश दिल्यावर स्वच्छता निरीक्षक राजू निकाळजे यांनी दोन हॉटलींवर छापेमारी करून तब्बल 250 किलो प्लॅस्टिकचा साठा जप्त करून दंड म्हणून प्रत्येकी पाच हजार अशा 10 हजार रुपयांच्या पावत्या फाडल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on BJP leader's Relatives